भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकाला बुधवारपासून (28 नोव्हेंबर) सुरूवात झाली. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने फ्रान्सला 2-1 असे पराभूत करत पूर्ण तीन गुण मिळवले.
यावेळी न्यूझीलंडच्या रसल केन, स्टीफन जेनेस आणि फ्रान्सच्या चारलेट विक्टर यांनी प्रत्येकी एक गोल केला.
यावेळी दोन्ही संघानी सावधानतेने सामन्याला सुरूवात केली. पहिल्या सत्रात तोडीसतोड खेळत एकही गोल झाला नाही.
दुसऱ्या सत्राला न्यूझीलंडने आक्रमक खेळाला सुरूवात केली. त्यांच्याकडून केनने 16व्या मिनिटाला या सामन्यातील पहिला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यावेळी फ्रान्स संघाने उत्कृष्ठ बचाव करत न्यूझीलंडला रोखून धरले होते.
या सामन्यात फ्रान्सला एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र न्यूझीलंडचा गोलकिपर जॉयस रिचर्डने आजच्या सामन्यात उत्तम कामगिरी करत फ्रान्सचे अनेक हल्ले परतवून लावले. तिसरे सत्र संपण्यास काही वेळ शिल्लक असताना फ्रान्सच्या ह्यूगो जेनस्टेटने सामना बोरबरीत आणण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.
सामना संपण्यास 6 मिनिटे बाकी असताना फ्रान्सला पेन्लटी कॉर्नर मिळाली. मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात मॅसन चार्ल्सला अपयश आले.
ब्लॅकस्टीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंड संघाचा दुसरा गोल 56व्या मिनिटाला आला. जेनेसने गोल करत संघाला 2-0 असे पुढे नेले.
फ्रान्सचा कर्णधार चारलेट विक्टरने 59व्या मिनिटाला गोल संघाचे खाते उघडले. पण श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडच वरचढ ठरला.
जागतीक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडने 1976 च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. मात्र त्यानंतर त्यांची खास कामगिरी झालेली नाही. 2012 च्या आॅलिम्पिकमध्ये ते नवव्या तर 2016 च्या आॅलिम्पिकमध्ये सातव्या क्रमांकावर होते.
28 वर्षानंतर विश्वचषकासाठी पात्र ठरलेला फ्रान्स जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर आहे.
तसेच स्टीफन जेनेस हा या सामन्याचा सामनकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: स्पेन विरुद्धच्या थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय
–हॉकी विश्वचषक २०१८: पाकिस्तानी क्रिडा पत्रकारांचा व्हिसा नामंजूर
–२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम