पुणे, 6 जानेवारी: हॉकी महाराष्ट्राच्या पुरुष संघाने एक्सपोजर आणि एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत मैत्रीपूर्ण हॉकी सामन्यांत हॉकी क्लब इंटर-मोल, बेल्जियमविरुद्ध दोन्ही सामन्यांत विजय मिळवले. मात्र, महिला संघाला नेदरलँड्सच्या एचसी ब्लोमेंडालकडून पराभूत व्हावे लागले.
नेदरलँड्ससोबतच्या पहिल्या हॉकी महाराष्ट्र एक्स्पोजर आणि एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे मैत्रीपूर्ण सामने खेळवण्यात आले.
तीन दिवसीय हॉकी फेस्टमध्ये युरोपमधील उत्कृष्ट संघ आमनेसामने आले. त्यात हॉकी क्लब इंटर-मोल बेल्जियम या पुरुष संघाचा समावेश होता. कलेक्टिव्ह माइंड्स फाउंडेशनच्या सौजन्याने हा संघ सहभागी झाला. हा प्रोग्राममागे हॉकीद्वारे दोन्ही देशांमधील अनुभवांची देवाणघेवाण करण्याची योजना होती.
त्याचप्रमाणे एचसी ब्लोमेंडाल, नेदरलँड महिला संघाचा भारताच्या दौऱ्यात समावेश होता. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता डच खेळाडू फ्लोरिस जॅन बोवेलँडर यांच्या नेतृत्वाखाली बोव्हेलँडर फाउंडेशनच्या सहकार्याने संघ सहभागी झाला.
प्रदर्शनीय सामने 3 दिवस आयोजित करण्यात आले. पहिले दोन दिवस पुरुष संघ खेळले. त्यानंतर महिलांनी प्रत्येकी एक सामना खेळला. शेवटच्या दिवशी दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आले. त्यानंतर मैत्रीपूर्ण स्पर्धेची सांगता झाली.
या स्पर्धेत हॉकी महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिलांचे प्रतिनिधित्व त्यांच्या राखीव संघांनी केले होते. हॉकी महाराष्ट्र पुरुष संघाने मायदेशातील श्रेष्ठत्व दोन्ही सामने सहज जिंकले. प्रथम त्यांनी 3-1 असा विजय मिळवला. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा 5-0 असा धुव्वा उडविला.
महाराष्ट्राच्या महिलांना डच संघाने मोठ्या फरकाने पराभूत केले. ‘डच वर्चस्वा’ने सलामीला 0-10 आणि नंतर 0-18 असे विजय साजरे केले.
निकाल:
सामना-1: हॉकी महाराष्ट्र: 3 (स्टीफन स्वामी 2′, गोविंद नाग 44′ – पीसी, सजीव चव्हाण 57′) विजयी वि. बेल्जियम: 1 (सायमन लेग्रँड 48′ – पीसी).
सामना-2: हॉकी महाराष्ट्र: 5 (स्टीफन स्वामी 22′, 37′ – पीसी, 42′, तेजस चव्हाण 38′, करण ठोसरे 50′) विजयी वि. बेल्जियम: 0
सामना-1: एचसी ब्लोमेंडाल, नेदरलँड्स: 10 (रायने डूजेवार्ड 2′, 16′, नोआ व्हॅन डर हर्क 11′, ज्युली हूगेंडूर्न 22′, 23′, मॉड प्रेयडे 35′, ऍनेलीज पॉस 22′ – पीसी, मालोस’4′, रोसमन, 4′ नॅनिंग ५२’) विजयी वि. हॉकी महाराष्ट्र: ०
सामना-२: एचसी ब्लोमेंडाल, नेदरलँड्स: १८ विजयी वि. हॉकी महाराष्ट्र: ०