भूवनेश्वर। आजपासून (28 नोव्हेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकाला सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे.
या विश्वचषकात 16 देश सहभागी होत असून त्यांचे प्रत्येकी चार गट करण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश क गटात असून त्यांच्या बरोबर कॅनडा आणि बेल्जियमचाही समावेश आहे.
भारतीय संघ मिडफिल्डर मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणार असून चिंग्लेसना सिंग कंगुजाम हा संघाचा उपकर्णधार आहे. तसेच हरेंन्द्रा सिंग संघाचे प्रशिक्षक आहेत.
2014मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यामध्ये भारताने 5-2 असा विजय मिळवला होता. सुमारे चार वर्षानंतर हे दोन संघ आज आमने-सामने येणार आहेत.
तसेच पहिल्या सराव सामन्यात भारताने अर्जेटीनाला 5-0 असे पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात स्पेनने भारताला 1-2 असे रोखले होते.
आजचा सामना चिंग्लेसनाचा 200वा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तसेच मनदीप आणि दिलप्रीत आजच्या सामन्यात गोल करू शकतात. संघाचा धनराज पिल्ले म्हणजेच आकाशदिपही चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या कामगिरीत बरीच सुधारणा केली आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत. तसेच सरदार सिंगच्या निवृत्तीने मिडफिल्डरची फळी थोडीफार कमकुवत झाली आहे. सिम्रनजीत सिंग आणि निलकांता शर्मा याच्या अटॅकिंग शैलीने संघात घेतले आहे.
तसेच जागतिक क्रमवारीत भारत 5व्या तर दक्षिण आफ्रिका 15व्या स्थानावर आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दूरदर्शनवर होणार आहे.
हे वर्ष भारतीय हॉकीसाठी निराशाजनकच ठरले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत एकही पदक पटकावता आले नाही तर एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक थोडक्यात हुकले. तसेच 2010ला दिल्लीत झालेल्या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. मग आजच्या सामन्यात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे लक्ष असणार आहे.
भारतीय संघ: मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलकिपर), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिम्रनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलकिपर),
दक्षिण आफ्रिका संघ: ड्रुमॉँड टीम (कर्णधार), स्मिथ ऑस्टीन, ड्लुंग्वाना टायसन, विंबी ओवेन, लेमबेथ डुडुज्हो, हाइक्स जुलियन, हॅमॉंड थॉमस, होर्ने किनन, कॅसिम दयान, हॅलकेट ऱ्हेट, पॉट्झ रिचर्ड, जुलीयस रायन, डार्ट टायलर, पॅटॉन ट्रनी, मिआ मोहम्मद, लोव लान्स, युस्टस जेथ्रो, बेल डॅनियल, पिटर्स रस्सी (गोलकिपर), स्पॅनर निकोलस, टूली कोबीले, जोन्स गोवान (गोलकिपर)
महत्त्वाच्या बातम्या:
–१०२ भारतीय फलंदाजांचा विक्रम मोडण्याची विराटला संधी
–पावसामुळे वाया गेलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी कर्णधार कोहलीची नवी युक्ती