नवी दिल्ली| हॉकी मिझोरम या बोर्डाला शुक्रवारी (6 नोव्हेंबेर) नवी दिल्लीतील 10 व्या हॉकी इंडिया कॉंग्रेसतर्फे सन् 2019-2020 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट हॉकी इंडिया सदस्य विभाग हा पुरस्कार मिळाला. अध्यक्ष सुश्री जोथानकिमी आणि सरचिटणीस श्री. लालरिनफेला यांच्या नेतृत्वाखालील हॉकी मिझोरमने राज्यात हॉकीच्या प्रचारासाठी काम केले आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांत या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रचंड उत्साह दाखवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज प्रशिक्षण विकसित करण्याच्या दिशेने त्यांनी काम केले आहे.
खेळाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात, त्यांनी अनेक स्थानिक पातळीवरील स्पर्धा आयोजित केल्या आहेत. मिजोरममधील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. हॉकी मिझोरम अगदी लहान पातळीवरील हॉकीच्या विकासासाठी सक्रिय आहे. विशेषत: महिला गटात, ज्यामधून भविष्यात राष्ट्रीय संघांना अधिक प्रतिभावन हॉकीपटू मिळतील.
Congratulations to Hockey Mizoram on being recognized as the Hockey India Best State Member Unit for 2019-2020 at the 10th Hockey India Congress held on 6th November, 2020. 👏#IndiaKaGame pic.twitter.com/WJc4QgqecT
— Hockey India (@TheHockeyIndia) November 6, 2020
“हा पुरस्कार म्हणजे खेळाच्या विकासासाठी आणि अधिकाधिक तरुणांना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना मिळालेली ओळख आहे. हॉकी इंडियाने एक स्टँडर्ड निश्चित केले आहे आणि राज्य सदस्य संघटनांनीही व्यावसायिक पद्धतीने कामगिरी करावी हीच अपेक्षा आहे . त्यांनी ठरवलेल हेच बेंचमार्क आम्हाला संघर्ष करण्यास प्रवृत्त करते ”असे अध्यक्ष जोथानकिमी यांनी सांगितले
हॉकी इंडियाने राकेश कुमार यांना हॉकी इंडियाचा सर्वोत्कृष्ट कर्मचारी(2019-2020) म्हणून सन्मानित केले आहे. राकेश कुमार हे खरेदी व प्रशासन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आहे.
नागपूरमधील मनीष गौर यांना हॉकी इंडियाच्या बेस्ट टेक्निकल ऑफिशियल 2019-20 या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी सहा स्पर्धांमध्ये योगदान दिले आहे. पुणे येथे आयोजित दुसर्या खेलो इंडिया यूथ स्पर्धेत ते टेक्निकल डेलिगेट होते.
महत्त्वाच्या बातम्या –
एशियन हॉकी फेडेरेशन घेणार निशुल्क शैक्षणिक कार्यशाळा, ‘या’ अधिकाऱ्यांना मिळणार लाभ
“…अंगावर काटा आला होता”, ऑलिम्पिक पात्रता सामन्यातील आठवणींना दिग्गज हॉकीपटूने दिला उजाळा