भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉजने माफी मागितली आहे. पुढील आठवड्यात सुरु होत असलेल्या आयपीएल मोसमात खेळता यावे आणि खांद्याच्या दुखापतीपासून विश्रांती मिळावी म्हणून विराटने चौथ्या कसोटीमधून माघार घेतल्याचं वादग्रस्त वक्तव्य हॉजने केले होते. चौथ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दिवशी खांद्याच्या दुखापतीमुळे कोहलीने कसोटीमधून माघार घेतली होती.
भारतीय संघाचं नेतृत्व कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने केले होते. आपल्या माफीनामान्यात हॉजने पुढे असं म्हटलं आहे कि, “मी सर्व भारतीय नागरिक, क्रिकेट चाहते, भारतीय संघ आणि विशेषकरून विराट कोहलीची माफी मागतो. कुणावर टीका करण्यासाठी मी हे वक्तव्य केलं नाही तर आयपीएलचा त्यातून सन्मान व्हावा हेच मला प्रतीत होत. मी गेली कित्येक वर्ष आयपीएलचा आनंद घेत आहे. सर्व क्रिकेट चाहत्यांना नाराज होण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी पुन्हा सर्व भारत वासियांची माफी मागतो ज्यांनी मला एवढं प्रेम दिल आहे. विराट सारख्या प्रेरणादायी खेळाडूबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. माझ्या मनात विराट बद्दल फक्त आणि फक्त सन्मान आहे.”
यावर भारताचा फिरकीपटू अश्विनने हॉजची फिरकी घेताना असे म्हटले आहे कि यापुढे ३० मार्च हा जागतिक माफी दिवस म्हणून ओळखला जाईल.