पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिससंघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी अ, बालेवाडी ब, लॉ कॉलेज लायन्स आणि सोलारिस आरपीटीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ संघाने एमडब्लूटीए अ संघाचा 24-7असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून डॉ. जमेनिस, केदार शहा, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ, जयंत कढे, प्रशांत सुतार, सुंदर अय्यर यांनी अफलातून कामगिरी केली.
तारक पारीख, शिवाजी यादव/अभिजित मराठे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर लॉ कॉलेज लायन्स संघाने ओडीएमटी अ संघाचा 20-18असा संघर्षपूर्ण पराभव केला. बालेवाडी ब संघाने नवसह्याद्री डायनामाईट्सचा 21-16 असा तर, सोलारिस आरपीटीए संघाने एमडब्लूटीए क संघाचा 21-15असा पराभव करून शानदार सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: इलाईट डिव्हिजन
पीवायसी अ वि.वि.एमडब्लूटीए अ 24-7(100अधिक गट: डॉ. जमेनिस/केदार शहा वि.वि.जयदीप वाकणकर/प्रवीण पांचाळ 6-1; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.सुमंत पॉल/आशिष मणियार 6-1; 90अधिक गट: जयंत कढे/प्रशांत सुतार वि.वि.सुनील लुल्ला/राजेश मंकणी 6-3; खुला गट: केदार शहा/सुंदर अय्यर वि.वि.विवेक खडगे/अभिषेक सिंग6-2);
बालेवाडी ब वि.वि.नवसह्याद्री डायनामाईट्स 21-16(100अधिक गट: खन्ना/मनू एच.एन वि.वि.आदित्य जोशी/किशोर राजापूरकर 6-4; खुला गट: सचिन बी/निरव डी वि.वि.आदित्य जोशी/रोहन राजापूरकर 6-4; 90अधिक गट: माने/सोपल पराभूत वि.उमेश भिडे/स्वीकार सुगंधी 3-6; खुला गट: दत्ता धोंगडे/मनू एच. एन वि.वि.आशिष डिके/गजानन कुलकर्णी 6-2);
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.ओडीएमटी अ 20-18(100अधिक गट:केतन जठार/दिगंबर गोखले पराभूत वि.संतोष खुराडे/उदय गुप्ते 5-6(6-8); खुला गट: केतन जठार/तारक पारीख वि.वि.शशी मापारी/निलेश गायकवाड 6-3; 90अधिक गट: शिवाजी यादव/अभिजित मराठे वि.वि.अतुल मांडवकर/नितीन सिंघवी 6-3; खुला गट: सतीश ओरसे/जयभाई पराभूत वि.कोनार कुमार/संतोष कुमार 3-6);
सोलारिस आरपीटीए वि.वि.एमडब्लूटीए क 21-15(100अधिक गट: नाम जोशी/रवींद्र पांडे पराभूत वि.सलीम वाडीवाला/अजय चौहान 3-6; खुला गट: संजीव घोलप/जयंत पवार वि.वि.अंकित/अजय चौहान 6-4; 90अधिक गट: सिद्धू भरमगोंडे/रवींद्र कात्रे वि.वि.संजय आशेर/शायनी बरेटो 6-3; खुला गट: रवींद्र पांडे/हेमंत भोसले वि.वि.पार्थ महापात्रा/विक्रम गुलानी 6-2).