---Advertisement---

हॉंगकॉंगच्या गोलंदाजाने स्विकारलेय विराटला बाद करण्याचे चॅलेंज; चार वर्षांपूर्वी रोहित-धोनीला दाखवलेला तंबूचा रस्ता

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 6:37 PM
Virat-Kohli-Laugh
---Advertisement---

भारतीय संघाने आशिया चषक 2022 ची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे आव्हान होते. रविवारी (28 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या टी20 सामन्यात भारताने पाच विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला. आता भारताला बुधवारी (31 ऑगस्ट) हॉंगकॉंग संघाविरुद्ध खेळायचे आहे. मात्र, या सामनापूर्वी हॉंगकॉंगचा अनुभवी फिरकीपटू एहसान खान याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

पात्रता फेरीतून मुख्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या हॉंगकॉंगचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या एहसान याने प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हटले,
“यावेळी मला देशभरातून हा संदेश मिळाला की, तू कोहलीला बाद कर. मात्र, तो खूप मोठा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत माझे नाव त्याच्याशी जोडणे योग्य ठरणार नाही. मात्र, तरीही मी त्याला बाद करण्याचा प्रयत्न करेन.”
एहसान खान याने चार वर्षांपूर्वी झालेल्या वनडे आशिया चषकात भारताविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्यात त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार एमएस धोनी यांना बाद केलेले. यंदाही एहसान जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. पात्रता फेरीच्या तीन सामन्यात नऊ बळी मिळवून त्याने हाँगकाँग संघाला मुख्य फेरीपर्यंत आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह

हाँगकाँग: निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मीन मुर्तजा, किनचित शाह, स्कॉट मैककेनी (यष्टीरक्षक), हारून अरशद, एजाज खान, जीशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गजानफर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तानचे संघ सापडले नियमाच्या कचाट्यात! आयसीसीने केली दोन्ही संघांवर कठोर कारवाई
‘टीम इंडिया कार्तिकवर अन्याय करतेय!’ माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा
रैनाच्या गोंडस मुलाची ‘भारी’ बॅटिंग! क्युट व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---