हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खान याचे बनावट ट्विटर अकाउंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निजाकत खान यांनी ट्विट करून याची पुष्टी केली आहे. या अकाऊंटवर शेअर केलेले विचार त्याचे नसून ते फेक अकाउंट असल्याचे त्यानी म्हटले आहे. निजाकत खानच्या बनावट ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले होते, ज्यामध्ये ते आता आशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाला सपोर्ट करणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय त्या ट्विटमध्ये पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले होते.
मात्र, जेव्हा निझाकत खानने पाहिले की त्यांच्या नावाचे बनावट खाते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तेव्हा त्यांनी ट्विट करून ते टाळण्याचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, मी सर्वांना सांगू इच्छितो की हे एक बनावट खाते आहे. या खात्यावर जे काही शेअर केले जात आहे ते माझे नाही. मला या खात्याची तक्रार करण्यास मदत करा धन्यवाद.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
यूएस ओपनच्या तिसऱ्या राउंडमध्येच थांबला टेनिस क्वीन सेरेना विलियम्सचा प्रवास
आता श्रीलंका अफगाणिस्तानची जिरवणार! पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘ही’ तगडी इलेव्हन उतरवणार
VIDEO: पाकिस्तानी संघाने केली टीम इंडियाची नक्कल! दरियादिली दाखवल्यानंतरही होत आहेत ट्रोल