आशिया कप 2022मध्ये भारताचा दुसरा सामना हाँगकाँग संघासोबत आहे. क्रिकेट जगतात या संघाचे नाव क्वचितच ऐकायला मिळते. टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध आतापर्यंत फक्त दोन वनडे सामने खेळले असून दोन्ही जिंकले आहेत. भारतीय संघ प्रथमच हाँगकाँगविरुद्ध टी-20 सामना खेळणार आहे. भारतासाठी हा सामना जिंकणे फारसे अवघड असणार नाही. मात्र, हाँगकाँगचा संघ एकदम सरप्राईज आहे.
आशिया कपच्या मुख्य फेरीत पोहोचलेल्या हाँगकाँगच्या संघात स्थानिक रहिवासी नाहीत. 17 सदस्यीय संघात 12 खेळाडू पाकिस्तानचे आहेत. चार खेळाडू भारताचे आहेत आणि एक खेळाडू इंग्लंडचा आहे. विशेष बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू कोणत्याही लीगमध्ये एकत्र खेळत नसून दोन्ही देशांचे खेळाडू हाँगकाँगच्या संघात एकत्र खेळतात. या संघातून खेळणाऱ्या खेळाडूंचे भारत आणि पाकिस्तानशी संबंध असले तरी त्यांचा बीसीसीआय किंवा पीसीबीशी संबंध नाही.
कर्णधार पाकिस्तानी आणि उपकर्णधार भारतीय
हाँगकाँग संघाचा कर्णधार निझाकत खान हा पंजाब, पाकिस्तानचा आहे. त्यांचा जन्म अट्टक येथे झाला. त्याचवेळी संघाचा उपकर्णधार किंचित शाह भारताशी संबंधित आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबई शहरात झाला. याशिवाय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज स्कॉट मॅकेन्झी मूळचा इंग्लंडचा आहे. हाँगकाँगच्या स्थानिक लोकांमध्ये क्रिकेटमध्ये फारसा रस नाही. त्यामुळेच तेथील लोक चांगले क्रिकेटपटूही नाहीत.
हाँगकाँगच्या संघातील कोणता खेळाडू कोणत्या देशाचा आहे हे जाणून घेऊया
पाकिस्तान
यासीम मोर्तझा: संघाचा अव्वल फलंदाज हा मूळचा पंजाब, पाकिस्तानचा आहे. त्यांचा जन्म सियालकोट येथे झाला.
निझाकत खान : हाँगकाँगचा कर्णधारही पाकिस्तानातील पंजाबचा आहे. त्यांचा जन्म अट्टक येथे झाला.
बाबर हयात : हाँगकाँगच्या सध्याच्या संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज बाबर हाही पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील अटॉकचा आहे.
एजाज खान: एजाजचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला, परंतु त्याचे पालक पाकिस्तानचे आहेत, जे नंतर हाँगकाँगमध्ये गेले.
झीशान अली : झीशान अलीचाही जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये झाला.
हारून अर्शन : संघाचा वेगवान गोलंदाज हारून हा देखील पाकिस्तानी वंशाचा आहे.
एहसान खान : एहसानचाही जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे झाला.
मोहम्मद गजनपार: पाकिस्तानी वंशाचा मोहम्मद गजनपार आता हाँगकाँगसाठी क्रिकेट खेळतो.
वाजिद शाह : वाजिद हा देखील पाकिस्तानी वंशाचा आहे.
आफताब हुसेन : आफताबचाही संबंध पाकिस्तानशी आहे.
मोहम्मद वाहीद : पाकिस्तानी वंशाचा वहीद हा देखील हाँगकाँग संघाचा भाग आहे.
अतिक इक्बाल : पाकिस्तानचा अतिक हाँगकाँगकडूनही खेळतो.
भारत
किंचित शाह: भारतातील मुंबई शहरात जन्मलेला किंचित शाह आता हाँगकाँगसाठी क्रिकेटही खेळतो.
आयुष शुक्ला : संघाचा वेगवान गोलंदाज आयुष हा भारतीय वंशाचा आहे.
धनंजय राव: धनंजय राव हे भारतीय वंशाचे आहेत.
अहान त्रिवेदी : भारतीय वंशाचा अहानही हाँगकाँग संघात आहे.
इंग्लंड
स्कॉट मॅकेन्झी : संघाचा यष्टिरक्षक फलंदाज स्कॉट मॅकेन्झी हा इंग्लंडचा रहिवासी आहे. तो मँचेस्टर शहराचा आहे. मॅकेन्झीचा जन्म लँकेशायरमध्ये झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने
हाँगकाँगला भिडण्याआधी भारतीय खेळाडूंची खास समुद्रीसफर, फोटो एकदा बघाच
‘मध्यंतरी मी मेल्याच्याही बातम्या आल्या होत्या…’, पत्रकाराला मिळाले भारतीय खेळाडूकडून भन्नाट उत्तर