भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या संघातून बाहेर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. तिसऱ्या कसोटीसाठी दिग्गज फलंदाज संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा मुख्य प्रसिक्षक ब्रँडन मॅक्युलम याने खास प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचे तीन सामने बाकी आहेत. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. तिसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सुरू होईल. या सामन्यासाठी लवकरच भारतीय संघ घोषित केला जाणार आहे. पण त्याआधीच विराटच्या फिटनेस आणि संघातून बाहेर असण्याच्या कारणाविषयी चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराटच्या आईची तब्येत बिघडली आहे, अशाही बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. पण त्याचा भाऊ विकार कोहलीने या बातम्या चुकीच्या ठरवल्या. अशातच आता न्यूझीलंडचा माजी दिग्गज आणि इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम () याने विराटच्या कुटुंबात सर्वकाही ठीक सुरू असेल, अशी आशा व्यक्त केली.
राजकोट कसोटीआधी मॅक्युलम म्हणाला, “विराट महान खेळाडूंपैकी एक आहे. यात काहीच शंका नाही की, त्याच्या पुनरागमनाने संघात सुधारना होईल. आपण नेहमी बोलतो की, भारतीय क्रिकेटमधील प्रतिभा, त्यांच्याकडे असलीली गुणवत्ता अपार आहे. त्यामुळे आम्ही या विरोधी संघाचा सन्मान करतो. मला आशा आहे की, विराटच्या कुटुंबात सर्वकाही ठीक सुरू असेल. त्याने पुनरागमन केले, तर ते आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही तयार आहोत. तो एक चांगला प्रतिस्पर्धी आहे. मी त्याला चांगला ओळखतो आणि त्याच्यासोबत खेळताना मजा येते.”
दरम्यान, उभय संघांतील या मालिकेतील शेवटचे दोन सामने 23 ते 27 आणि 7 ते 11 मार्च यादरम्यान खेळले जातील. (‘Hope everything is going well at his home’, the veteran’s reaction to Virat’s comeback)
महत्वाच्या बातम्या –
जसप्रीत जसबीर सिंग बुमराह! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ कारणामा पहिल्यांदाच, हलवली अख्खी ICC Ranking
झिम्बाब्वे क्रिकेटला भारताचा नेहमीच पाठिंबा, पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा दौरा फिक्स