---Advertisement---

“आशा आहे आयपीएल २०२१ पुन्हा सुरु होईल आणि मी त्यात खेळेल”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने व्यक्त केला मानस

On: रविवार, मे 16, 2021 12:48 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे इंडियन प्रीमीयर लीगचा 14 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे आता उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार, याबद्दल विविध चर्चा होत आहेत. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले आहे की जर, आयपीएल 2021 स्पर्धा पुन्हा सुरू झाली तर तो नक्कीच खेळेल.

दुखापतीतून सावरून नुकताच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या आर्चरने ससेक्सने विरुद्ध केंट यांच्यातील काउंटी चॅम्पियनशिपच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. आर्चरने 13 षटकांत 29 धावा देत 2 बळी घेतले. इंग्लंडच्या भारत दौर्‍यादरम्यान आर्चरला कोपरात दुखापत झाली होती, त्यामुळे तो संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर झाला होता.

आर्चर ससेक्स क्रिकेट यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “जरी मी भारतात गेलो असतो (दुखापतीतून सावरल्यानंतर), तरी मी लवकरच घरी परतलो असतो. आशा आहे की, यावर्षीच्या आयपीएलचे उर्वरित सामने झाल्यास मी पुन्हा त्यात खेळू शकेल. भारतात न जाण्याचा निर्णय कठीण होता. मी तिथे गेलो असतो तरीही मला किती सामने खेळता येतील हे माहित नव्हते.”

आर्चर पुढे म्हणाला की, “राजस्थान रॉयल्स आणि इंग्लंड संघाने माझ्या निर्णयाचे समर्थन केले. मी राजस्थान संघासोबत गेल्या तीन वर्षांत जसे संबंध निर्माण केले आहे तसेच चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न करेल. माझी फिटनेस चांगली आहे. मला वाटते आहे की मी चांगली गोलंदाजी केली आहे. मी गेल्या आठवड्यात ससेक्सच्या द्वितीय श्रेणीच्या संघाकडून खेळलो होतो. ”

जवळजवळ दीड महिन्यात प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार्‍या आर्चरने शानदार कामगिरी केली. त्याने झेक क्रॉली आणि केंटचा कर्णधार बेल ड्रममंडला बाद केले. अर्चारच्या भेदक गोलंदाजीमुळेच केंटचा पहिला डाव केवळ 145 धावांवर आटोपला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ‘अशाप्रकारे’ करावी लागेल कोरोना चाचणी

आता क्रिकेटमध्ये ‘बायो-बबल’ ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---