---Advertisement---

हॉटेलचा माफीनामा, विराट कोहलीच्या रुमचा व्हिडिओ लीक झाल्याबद्दल संंबंधित व्यक्तींवर कारवाईचा बडगा

On: सोमवार, ऑक्टोबर 31, 2022 5:10 PM
Virat Kohli
---Advertisement---

क्रिकेटविश्वात सोमवारचा (31 ऑक्टोबर) दिवस भारताच्या स्टार फलंदाजाच्या एका पोस्टने चांगलाच गाजला. त्याला कारणही तसेच आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेयर केला. हा व्हिडिओ त्याच्या ऑस्ट्रेलियातील हॉटेल रूमचा असून कोणत्या तरी चाहत्याने तो लीक केला होता. यामुळे विराटने स्वत:च तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाउंटवर शेयर केला आणि कसे आपले खाजगी आयुष्य धोक्यात आले आहे, असे म्हणत राग व्यक्त केला. विराटने व्हिडिओ पोस्ट करताच काही तासांतच हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाल केली. त्यांनी विराटची माफी मागितली आणि संबंधित व्यक्तीवर योग्य ती ऍक्शन घेतली.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी पर्थच्या क्राऊन रिसॉर्ट्समध्ये थांबला. तेथेच विराट कोहली (Virat Kohli) याच्या रुमचा व्हिडिओ एका चाहत्याने शूट केला आणि व्हायरल केला. विराटला हे लक्षात येताच त्याने स्वत: हा तो व्हिडिओ शेयर त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मी समजू शकतो की मी चाहत्यांचा आवडता खेळाडू आहे. ते मला पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात, मात्र हा व्हिडिओ भीतीदायक आहे. हे पाहून मला माझ्या खाजगी आयुष्याबाबत भीती निर्माण झाली आहे. जर मला माझ्या हॉटले रूममध्येच प्रायव्हसी मिळत नसेल तर बाकी ठिकाणी मी त्याची अपेक्षाही करू शकत नाही. मी अशा प्रकारच्या फॅनाटिज्मला नाही मानत. माझी विनंती आहे की, तुम्ही लोकांच्या खाजगी जीवनाची काळजी घ्या आणि त्याला कोणाच्याही मनोरंजनाचे साधन बनवू नका.’

संबंधित व्यक्तिने किंग कोहलीच्या हॉटेलची रुम अशा नावाने रुममधील प्रत्येक कोपऱ्याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ ज्याप्रकारे शूट केला गेला त्यावरून हॉटेल स्टाफही त्याच्यासोबत असल्याची शक्यता आहे.

क्राउन रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापकीय विभागातील अधिकाऱ्यांने सांगितले की, “आम्ही सहभागी असलेल्या अतिथींची बिनशर्त माफी मागतो आणि ही एक वेगळी घटना राहिल याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे सुरू ठेवू. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांना क्राउन खात्यांमधून काढून टाकण्यात आले आहे.”

विराटच्या या पोस्टवर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहे. हे किती चुकीचे आहे, असेही त्याच्या चाहत्यांनी आणि खेळाडूंनी म्हटले आहे. त्याच्या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) यानेही कमेंट केली आहे. त्याने म्हटले, ‘हे अतिशय चुकीच असून संपूर्णपणे अमान्य आहे.’

या स्पर्धेत भारताचा पुढील सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना ऍडलेड येथे खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सं विरुद्ध सलग दोन विजय मिळवले होते. त्या दोन्ही सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी केल्या होत्या. यामधील त्याने पाकिस्तानविरुद्ध केलेली नाबाद 82 धावांची खेळी उल्लेखनीय ठरली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: आयर्लंडच्या गोलंदाजाविरुद्ध मार्शचा धोबीपछाड षटकार; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बापरे!’
एका माळेचे मणी! त्या समस्येने सर्वच संघांची विश्वचषकात वाढलीये डोकेदुखी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---