आयपीएलचे आता मोजून ७ सामने बाकी आहेत. या आयपीएलमध्ये तब्बल ६० सामने खेळवले जाणार आहेत. परंतु जसे ५० सामने पार पडले त्यानंतर खऱ्या अर्थाने खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा सुरु झाली ती नेट रन-रेटची.
त्याला कारणही तसंच आहे. या आयपीएलमध्ये पुढच्या फेरीत अर्थात प्ले-आॅफमध्ये प्रवेश करण्यासाठी नेट रन-रेट ही खुपच महत्त्वाचा ठरत आहे. तो यापुर्वीच्या आयपीएलमध्येही ठरला होताच परंतु यावेळी अनेक कारणांमुळे याची खुपच चर्चा होत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाच कारण म्हणजे गतविजेत्या आणि तीन वेळा चषक जिंकलेल्या मुंबईसारख्या संघालाही याच नेट रन-रेटवर अवलंबुन रहावं लागत आहे.
नक्की काय आहे नेट रन-रेटचे महत्त्व-
क्रिकेटच्या कोणत्याही स्पर्धेत ज्यात ३ किंवा अधिक संघ सहभागी होतात त्यात नेट रन-रेट गरजेचा असतो. याला कारण म्हणजे अशा स्पर्धात सर्व संघांना साखळी फेरीचे सारखेच सामने खेळायला मिळतात. त्यामुळे जेव्हा संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे जर समान गुण झाले असेल तर तेव्हा हा नेट रन-रेट काम करतो. ज्यांचा तो चांगला त्यांना पुढच्या फेरीत प्रवेश दिला जातो.
कसा मोजला जातो हा नेट रन-रेट –
A- संपुर्ण स्पर्धेत संघाने केलेल्या धावांना त्या संघाने संपुर्ण स्पर्धेत एकुण खेळलेल्या षटकांनी आधी भागलं जात.
B- त्या संघाने विरोधी संघाला संपुर्ण स्पर्धेत दिलेल्या धावांना विरोधी संघाने संपुर्ण स्पर्धेत खेळलेल्या षटकांनी भागल जात.
A मधुन B वजा केल्यावर येणारी संख्या म्हणजे त्या संघाचा नेट रन-रेट होय.
-या धावा संपुर्ण स्पर्धेतील मोजल्या जातात. जर संघ सर्वबाद (आॅल आऊट) झाला तर त्या संघाने खेळलेली षटके २० मोजली जातात.
-जर संघाने निर्धारीत ओव्हरपेक्षा कमी षटकांत धावांचा पाठलाग केला तर तो संघ जेवढी षटके फलंदाजी करत होता तीच मोजली जातात.
इंग्रजी भाषेत- NRR = (Total runs scored divided by total overs batted) minus (total runs conceded divided by total overs bowled). In simple words: Difference of run rate in batting and bowling.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल २०१८च्या शेवटच्या सामन्यापर्यंत विराटला या गोलंदाजांनी दिला त्रास
–अफगाणिस्तानचा राशीद खान भारताविरुद्ध कसोटी पदार्पणासाठी उत्सुक
–आयपीएलमधील प्रत्येक चेंडूमागे बीसीसीआयला मिळतात 23. 3 लाख रुपये
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार
-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!
–या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके