29 जून 2024 ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. या दिवशी भारतानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय क्रिकेट संघानं तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.
विजेतेपदाच्या लढतीत भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या रोमांचक अंतिम सामन्यासाठी चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळाली. आता आयसीसीनं चाहत्यांचं वेड आणि वर्ल्ड कप फायनलच्या व्हिडीओच्या प्रेक्षकसंख्येबाबत एक विशेष आकडेवारी शेअर केली आहे.
आयसीसीनं आपल्या अधिकृत ‘X’ खात्यावरून एक विशेष डेटा शेअर केला आहे. आयसीसीनं सांगितलं की, टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर 24 तासांच्या आत 1.3 अब्ज पेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या आयसीसी डिजिटल चॅनेलवर विजेतेपदाच्या सामन्याचा व्हिडिओ पाहिला. हा विक्रमी आकडा आहे. अंतिम सामन्यासाठी चाहत्यांमध्ये किती उत्साह होता हे आयसीसीनं शेअर केलेल्या माहितीवरून समजू शकतं.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलची क्रेझ डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळाली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तब्बल 5.3 कोटी लोकांनी विजेतेपदाचा सामना पाहिला!
A #T20WorldCup Final that will be remembered for ages ✨
Record-breaking digital numbers achieved in the 24 hours after the match 💪 pic.twitter.com/ejw0xJsiIY
— ICC (@ICC) July 7, 2024
बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला चाहत्यांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला होता. चाहते स्टेडियमच्या आत आणि बाहेर सतत भारतीय संघाचाच जयजयकार करत होते. भारतीय संघानंही चाहत्यांना निराश न करता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात अखेरपर्यंत लढा देत वर्ल्डकप घरी आणला.
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचं पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद जिंकण्याकडे असेल. पाकिस्तान या स्पर्धेचं आयोजन करत आहे. भारताची सध्याची कामगिरी पाहता संघ स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकू शकतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा! आगामी आयसीसी स्पर्धांसाठी दिलं अपडेट
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळालं टीममध्ये स्थान
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा एकतर्फी पराभव! युवराज-भज्जी सारखे दिग्गज सपशेल अपयशी