---Advertisement---

एका वर्षात किती कमावतात कोहली, धोनी आणि सचिन? रवी शास्त्रींचा मोठा खुलासा! म्हणाले…

On: शुक्रवार, जुलै 25, 2025 7:44 PM
Virat-Kohli, MS-Dhoni, Sachin-Tendulkar
---Advertisement---

Kohli, Dhoni, Tendulkar Earnings: क्रिकेटचा खेळ जरी अजून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला नसला, तरी या खेळाने सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गजांना श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे. या तिघांची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, ज्यांनी केवळ क्रिकेट खेळूनच नव्हे, तर स्पॉन्सरशिप आणि इन्व्हेस्टमेंट डील्सद्वारे खूप पैसा कमावला आहे. आता भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या कमाईवर असा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टवर (Stick to Cricket Podcast) इंग्लंडचे दिग्गज खेळाडू मायकल वॉनने (Michael Vaughan) रवी शास्त्रींना विचारले की, भारतीय क्रिकेटमध्ये सुपरस्टारचा दर्जा प्राप्त केलेले खेळाडू किती कमावतात. यावर रवी शास्त्रींनी जे उत्तर दिले, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

रवी शास्त्रींनी मोठा खुलासा करत सांगितले, “ते खूप मोठी कमाई करतात. ब्रँड्ससोबतच्या स्पॉन्सरशिप डील्समधून त्यांची 100 कोटींपेक्षा जास्त कमाई होते.” त्यांनी हेही सांगितले की, ही रक्कम सुमारे 10 दशलक्ष पाउंड्सपेक्षा (10 Million Pounds) जास्त असू शकते. पॅनलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या तोंडातून 10 दशलक्ष पाउंड्स ऐकून ‘वॉव’ असे उद्गार निघाले.

रवी शास्त्रींनी याच पॉडकास्टवर एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर, 15-20 जाहिराती एका दिवसात करू शकतात, हा मी एका दिवसाचा आकडा सांगत आहे. तुम्ही यापेक्षाही जास्त करू शकता, कारण इथे खूप जास्त क्रिकेट खेळले जाते.” (Sachin Tendulkar Virat Kohli Dhoni income)

विराट कोहली, एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये समाविष्ट आहेत. रिपोर्ट्सनुसार, या तिघांची एकूण संपत्ती 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. (Indian cricketers net worth)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---