एखादी मॅच अत्यंत थरारक चाललीये आणि तुम्ही ती म्युट करून पाहू शकता का? सर्वच्या सर्व जण यासाठी स्पष्ट नकार देतील. कारण मॅच जितकी क्रिकेटर्स खेळून रंगतदार बनवतात तितकीच ती आपल्या शब्दांनी रोमांचक बनवायचं काम कॉमेंटेटर करत असतात. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, क्रिकेट आणि प्रेक्षक यांना जोडणारा दुवा कोणता असेल तर तो म्हणजे टेलिव्हिजन कॉमेंटेटरर्स. रिची बेनो, जेफ्री बॉयकॉट, टोनी ग्रेग म्हणजे क्रिकेट कॉमेंट्रीचे त्रिदेव म्हणता येतील. भारतात हर्षा भोगले, सुनील गावसकर व रवी शास्त्री हा बहुमान मिळवतील. पूर्वी फक्त रिटायर झालेले क्रिकेटर्स कॉमेंट्री करायचे. मात्र, आज आयपीएलमध्ये तर अनेक सक्रिय क्रिकेटर्स कॉमेंट्री करताना दिसून येतात. त्यातही आकाश चोप्रा म्हणजे ज्ञानीबाबाच. चार-चार तास आलटून-पालटून कॉमेंट्री करणाऱ्या आयपीएलच्या कॉमेंटेटर्सना पगार किती मिळत असेल? याचा तुम्ही विचार केला आहे का? विचार केला असेल किंवा नसेलही केला तरी, आम्ही या गोष्टीचा आज या व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करू.
आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी आयपीएलचे ब्रॉडकास्टिंग राइट्स असलेल्या स्टार स्पोर्ट्सने ८० कॉमेंटेटरची लिस्ट जाहीर केली. हिंदी इंग्लिशसह भारतातील सात इतर प्रादेशिक भाषांमध्ये कॉमेंट्री केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हर्षा भोगले, सायमन डूल, सुनील गावसकर, डॅनी मॉरीसन यांच्यासारख्या कॉमेंट्री विश्वातील बड्या नावांसह कुणाल दाते, मनन देसाई यांच्यासारखे उदयोन्मुख कॉमेंटेटर्स या लिस्टमध्ये होते. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा पदभार सोडलेले रवी शास्त्री आणि मागील काही वर्षांपासून आयपीएलचा भाग नसलेली मयंती लँगर यांनीदेखील या आयपीएलमधून कॉमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक केले.
स्टार स्पोर्ट्सने कॉमेंटेटरची यादी जाहीर केली, तेव्हा त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला नाही. मात्र, इकडून तिकडून जुगाड करून ही माहिती आम्ही तुमचा पर्यंत घेऊन आलोच. यावर्षी इंग्लिश कॉमेंट्रीसाठी २२ कॉमेंटेटर्सना करारबद्ध करण्यात आले. या सर्वांना १.९ कोटी ते चार कोटींपर्यंत रक्कम एका सीझनमध्ये कॉमेंट्री करण्यासाठी दिली जाते. त्यातही सुनील गावसकर, हर्षा भोगले, इयान बिशप्स, ऍलन विल्कीन्स यांना सर्वाधिक मानधन देण्यात येते.
आयपीएल दरम्यान सर्वात सर्वात जास्त टीआरपी ज्या कॉमेंट्रीने मिळतो ती म्हणजे हिंदी कॉमेंट्री. भारतातील सर्वसामान्य लोक ही भाषा पटकन समजू शकतात. त्यामुळे स्टार स्पोर्ट हिंदी कॉमेंट्रीसाठी प्रसिद्ध क्रिकेटपटूंना आणण्याच्या प्रयत्नात असते. आकाश चोप्रा, इरफान पठाण, मोहम्मद कैफ या जानेमाने हिंदी कॉमेंटेटरसह यावर्षी सुरेश रैना, पियुष चावला, धवल कुलकर्णी यांनी कॉमेंट्री डेब्यू केला आहे. त्यांच्या जोडीला जतीन सप्रू आणि तानिया पूरोहित हे फॅन फेवरेट प्रेसेंटर ही आहेत. हिंदी कॉमेंटेटर्सना ७० लाख ते ३ कोटी रुपये एका सिझनचे दिले जातात. त्यातही आकाश सोपा सर्वाधिक कमाई करणारा कॉमेंटेटर आहे. सात वर्षांनंतर कॉमेंट्री करण्यासाठी आलेल्या रवी शास्त्री व कॉमेंट्री डेब्यू करणारा सुरेश रैना हे दोघेही ३ कोटी रुपये घेत असल्याचे सांगितले जात आहे.
मंडळी पटकन एक सेकंद हा व्हिडिओ पाॅज करून कमेंटमध्ये तुमचा आवडता कॉमेंटेटर कोण सांगा? पाहुयात कोणत्या कॉमेंटेटरला सर्वात जास्त पसंती मिळतेय. आता व्हिडिओत आपण आणखी पुढे जाऊ.
यावर्षी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठी, गुजराती, तामिळ तेलगू, कन्नड, बांगला आणि मल्याळम भाषेत कॉमेंट्री केली जात आहे. त्यासाठी तब्बल ५८ कॉमेंटेटर्स कॉमेंट्री करतायेत. यामध्ये व्यंकटेश प्रसाद, विनोद कांबळी, दिनेश मोंगिया एमएसके प्रसाद यासारख्या माजी इंटरनॅशनल क्रिकेटर्सचा समावेशही आहे. या सर्व कॉमेंटेटर्सना १० लाख ते २५ लाखांपर्यंत मानधन दिले जाते. विशेष म्हणजे या वर्षी भारतीय महिला क्रिकेटर्सचादेखील कॉमेंट्री पॅनेलमध्ये मोठा सहभाग दिसतो. वेदा कृष्णमूर्ती, स्नेहल प्रधान, भावना बालकृष्ण त्यापैकीच काही मोठी नावे.
या सर्व कॉमेंटेटर्सशिवाय सर्वात खास असतात ते डग आऊट कॉमेटेटर्स आणि प्रेसेंटर्स. मॅच टॉस, पीच रिपोर्ट, क्रिकेटर्सचे इंटरव्ह्यू घेणे आणि पोस्टमॅच प्रेझेंटेशन यासह समीक्षण करणे हे या कॉमेंटटेटर्स काम असते. या डग आऊट कॉमेटेटर्सची फी सर्वात जास्त असते. हे मल्टिटास्किंग कॉमेंटेटर एका सिझनचे तब्बल ४ ते ७ कोटी घेत असतात. जसे क्रिकेटर्स, टीम्स मालामाल होतात तसेच या कॉमेंटेटर्सवरही लक्ष्मीची कृपा होते. शेवटी तुम्ही आम्हाला क्रिकेटच्या आणखी जवळ घेऊन जायचं आणि ज्ञानात भर टाकण्याच पुण्यकर्म ते करतात ना!
महा स्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आरसीबीच्या दिनेश कार्तिकला दंड, कारण गुलदस्त्यात
‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ