IPL Prize Money: यंदाचा आयपीएल हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. (Indian Premier League 2025) या हंगामात अनेक नवे रेकाॅर्ड्स तसेच रोमांचक सामने देखील पाहाचला मिळाले. 70 रोमांचक सामन्यांनंतर, 4 संघ सापडले आहेत, जे प्लेऑफमध्ये एकमेकांशी भिडताना दिसतील. (4 teams have qualified for IPL 2025)
पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. त्याच वेळी, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर एलिमिनेटर सामन्याचा विजेता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाशी सामना करेल. (Equation for the 4 teams qualified for IPL 2025)
दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर फायनलमध्ये जिंकणारा संघ आयपीएल ट्राॅफीचा खरा मानकरी ठरेल. त्याच वेळी आयपीएल 2025 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळेल. तर जेतेपद सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस रक्कम देखील मिळेल. (The team that wins the IPL 2025 title will get Rs 20 crore)






