१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल !
चेंडूचा वापर !
आधी एकदिवसीय क्रिकेटमध्येही लाल चेंडूंचा वापर केला जात होता कारण सर्व खेळाडूं पांढरी जर्सी घालायचे. रंगीत कपडे आणि फ्लडलाइट्सच्या आगमनामुळे वनडे क्रिकेटला पांढऱ्या चेंडू वापरणे अनिवार्य झाले कारण लाल चेंडू रात्री शोधणे अवघड जात होते.
परंतु पांढऱ्या चेंडूला ५० षटके टिकणे अवघड झाले. चेंडूचा कडकपणा कमी होत होता, त्यामुळे ३५ षटकानंतर दुसरा चेंडू वापरण्यात येत असे.
बॉलमध्ये वापरल्या जाणा-या शिलाईचा जलदगती गोलंदाजांना खेळाच्या नंतरच्या टप्प्यात रिव्हर्स स्विंग करण्यासाठी उपयोग होऊ लागला. जुना चेंडू जास्त स्विंग होऊ लागला.
परंतु २०११ मध्ये आयसीसीने नवीन नियम तयार केला ज्यात खेळपट्टीच्या दोन्ही बाजूनी दोन वेगळे वेगळे चेंडू गोलंदाजाला वापरणे अनिवार्य केले.
यामुळे चेंडू कठीण आणि नवीन राहण्यात मदत झाली, त्यामुळे फलंदाजांना फटके खेळण्यासाठी मदत होऊ लागली आणि गोलंदाजांचे गोलंदाजी करणे आणखी कठीण होऊ लागले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बीसीसीआयमुळे या लोकांचे पगार अडकले, आता पैसे मिळवायला करताय ही कामं
-डीआरएस सिस्टीम तेव्हा असती तर भारताच्या या गोलंदाजाने घेतल्या असत्या ९०० विकेट्स