टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (Team india vs South Africa) यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना 30 नोव्हेंबरला रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जाणार आहे. कसोटी मालिका हरल्यानंतर टीम इंडियावर मोठा दबाव आहे. त्यामुळे वनडे मालिकेत मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल. यासाठी चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या (Rohit Sharma & Virat Kohli) दिग्गज खेळाडूंवर आहेत. हा सामना फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येईल, जाणून घ्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणारा हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. चाहत्यांना हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टारवरही या सामन्याचे थेट प्रसारण पाहता येईल. वेबसाइटवरूनही हा सामना पाहता येणार आहे. तसेच फ्रीमध्ये पाहण्याची इच्छा असणाऱ्या चाहत्यांना हा सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.सामना दुपारी असल्यामुळे चाहत्यांना रविवारचा दिवस आरामात एन्जॉय करता येईल.
दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त वनडे फॉरमॅटमध्येच खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आता दोघेही पुन्हा मैदानात दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजाही बऱ्याच काळानंतर निळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे या तिघांकडून टीम इंडिया पुन्हा जिंकताना पाहण्याची चाहत्यांची अपेक्षा आहे.
रोहित आणि विराट यांनी त्यांच्या शेवटच्या वनडे सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. तर जडेजाचा शेवटचा वनडे सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना होता.






