क्रिकेटमध्ये चमत्कार घडणं हे काही नवीन नाही. पण काही घटना अश्या घडतात ज्या आपण क्वचितच ऐकतो. अशीच एक गोष्ट काल इंग्लंडच्या १३ वर्षीय क्रिकेटरने करून दाखवली.
ल्युक रॉबिन्सन या १३ वर्षाच्या शालेय क्रिकेटरने ६ चेंडूत ६ बळी घेण्याचा अनोखा विक्रम केला. मजेशीर गोष्ट अशी की त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना त्रिफळाचित केले. फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबच्या १३ वर्षाखालील संघाकडून खेळताना त्याने हा विक्रम केला.
ल्युकचा सक्खा भाऊ त्याच संघात आहे व त्यावेळी तो क्षेत्ररक्षण करत होता. परिवारासमोर असा विक्रम घडवून आणल्यामुळे ल्युकच्या परिवारात सर्वतोपरी आनंद साजरा करण्यात आला. ल्युक जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा विरोधी संघाचे धावफलक होते १०-१ आणि ल्युकचे षटक संपल्यावर धावफलक झाले १०-७.
@bbctms @BBCLN. Luke robinson. Philadelphia CC u13. One over. 6 balls. 6 wickets. All bowled. 10-1 becomes 10-7. Incredible. pic.twitter.com/IUoaPnrvzf
— David Forrester (@shieldsbrief) August 9, 2017
Congratulations to our U13 Luke Robinson who took 6 wickets in an over tonight, all bowled v Langley Park U13s #6in6balls #wellbowled
— Philadelphia Cricket & Community Club (@PhiliCC) August 9, 2017