पुणे। आझम स्पोर्ट्स अकादमी व एचपी रॉयल्स यांनी अनुक्रमे पीडीसीए व रायाझिंग डे संघाला पराभूत करताना आझम महिला क्रिकेट टी-२० करंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेचे उ्दघाटन आयकर विभागाच्या सहआयुक्त दीपा हिरे व महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या उपाध्यक्षा अबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलजार शेख उपस्थित होते.
आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने पीडीसीए संघाला ८ गडी राखून करताना विजय साकारला. संजना शिंदे व किरण नवगिरे यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आझम संघाने पीडीसीए संघाला १९ षटकांत सर्वबाद ६४ धावांवर रोखले. दिव्या यादवने २४, प्रियांका सांगवानने १८ तर, अक्षदा दौंडकरने ९ धावा केल्या. आझम संघाडकडून संजना शिंदे व किरण नवगिरे यांनी प्रत्येकी ३, आरती दसगुडे व ऋषिता जांजल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आझम संघाने केवळ ७.५ षटकांत ६६ धावा २ गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करताना विजय साकारला. संजना शिंदे व किरण नवगिरे यांनी प्रत्येकी २५ धावा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रियांका सांगवानने एक गडी बाद केला. आझम संघाच्या संजना शिंदेला सामनावीर घोषित करण्यात आले.
दुसऱ्या लढतीत एच पी रॉयल्स संघाने रायाझिंग डे संघाला १०१ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना एच पी रॉयल्स संघाने २० षटकांत १ बाद १८२ धावा केल्या. सलामीवीर मुक्ता मगरेने १५ चौकरांच्या साहाय्याने १०६ धावांची खेळी केली. तिला सोनल पाटीलने ५८ धावा (५ चौकार) करताना सुरेख साथ दिली. रायाझिंग डे संघाकडून शलाका काणेने एक गडी बाद केला. रायाझिंग डे संघाला १४.१ षटकांत सर्वबाद ८१ धावाच करता आल्या. रायाझिंग संघाकडून इरा जाधवने २२, ईशा घुलेने १४ धावा करताना थोडासा प्रतिकार केला, मात्र त्या संघाला पराभावापासून वाचवू शकल्या नाहीत. गौतमी नाईकने ३, प्रज्ञा वीरकरने २ तर, पूनम खेमनार व के. इशिता यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मुक्ता मगरेला समनाविर घोषित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे टी२० मालिकेबाहेर, पुणेकर खेळाडूल टीम इंडियात संधी
IPL: बीसीसीआयने दाखवली फ्रँचायझींसाठी स्वतंत्र डॉक्टर नेमण्याची तयारी, ‘हे’ आहे कारण
प्रथमच आयपीएल लिलावात नसणार पंजाबची ‘प्रीती’; ट्विटरवर माहित देत लिहिले…