भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याचा इंग्लंडचा दौरा संपवून भारतात परतला आहे. तसेच भारतीय संघ सध्या अजून दोन महिने तरी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार नसल्याने त्याला विश्रांती मिळाली आहे.
या मिळालेल्या सुट्टीत धोनी माजी मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेलच्या लग्नातील संगीत सोहळ्यासाठी उपस्थित होता. तसेच झहिर खान, आरपी सिंग, पार्थिव पटेल आणि इरफान पठाण हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या सोहळ्यादरम्यानचा एक फोटो आरपी सिंगने ट्विटरवरुन शेअर केला आहे. यात तो, धोनी आणि पार्थिव पटेल कोणतीतरी चर्चा करत आहेत. तसेच आरपी सिंगने त्याला कॅप्शन देताना लिहिले आहे की, ‘दोन यष्टीरक्षक आणि एक वेगवान गोलंदाज. अंदाज लावा आम्ही काय चर्चा करत असू?’
या फोटोत असे दिसते की पार्थिव धोनीशी बोलत आहे, तर धोनी ते ऐकत आहे. त्यांच्या शेजारी आरपी सिंग उभा आहे.
Two wicketkeepers and one fast bowler. Guess what we are discussing? #Poornabanisoni pic.twitter.com/SvCTEODcci
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) July 20, 2018
बुधवारी (18 जुलै) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात पार्थिवला स्थान देण्यात आलेले नाही.
या भारतीय संघात वृद्धिमान सहा दुखापतग्रस्त असल्याने रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघाने केलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पार्थिवला कसोटीमध्ये संधी देण्यात आली होती. पण त्याला तो यात खास कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता.
तसेच धोनीने नुकत्याच केलेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याला काही विशेष करता आलेले नाही. त्याला त्याच्या संथ खेळण्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–श्रीलंकेचा धुव्वा उडवत 19 वर्षाखालील भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत विजय
–मुुरली विजय, करुण नायर फ्लॉप; इंग्लंड लायन्सचा भारतीय ‘अ’ संघावर दणदणीत विजय
–वनडेत द्विशतक करणारा हा ठरला पहिलाच पाकिस्तानी फलंदाज