कर्नाटकमधील व्यावसायिक टी20 लीग असलेल्या महाराजा टी20 ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी (29 ऑगस्ट) खेळला गेला. मनीष पांडे नेतृत्व करत असलेल्या हुबळी टायगर्स व करूण नायर धुरा वाहत असलेल्या मैसूर वॉरियर्स यांच्यातील या अंतिम सामन्यात सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला. हुबळी संघाने 8 धावांनी विजय मिळवत ट्रॉफी उंचावली.
साखळी फेरीनंतर अव्वल राहिलेल्या या दोन्ही संघातील अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेला हुबळी संघाचा सलामीवीर मोहम्मद तहा याने 40 चेंडूत 72 व कर्णधार मनीष पांडे याने 23 चेंडूंवर नाबाद अर्धशतक पूर्ण करत संघाला 203 धावांपर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना वॉरियर्स संघाने शानदार खेळ दाखवला. सलामीवीर आर समर्थ याने 63 धावांची खेळी केली. कर्णधार नायर याने देखील 38 धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाज वीस धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. मैसूर संघाला विजयासाठी अखेरच्या चार चेंडूंवर 11 धावांची आवश्यकता असताना जगदिश सुचित याने जवळपास षटकार फटकावलेला असतानाच, मनीष पांडे यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण करत पाच धावा वाचवल्या. त्यामुळे हुबळी संघ आठ धावांनी विजय साजरा करू शकला.
हुबळी संघाचा सलामीवीर मोहम्मद तहा याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Hubli Tigers Won Maharaja T20 Trophy Manish Pandey Fielding Heroics)
महत्वाच्या बातम्या –
मोठ्या टी-20 लीगसाठी स्मृती मंधानाचा नकार! खेळणार मायदेशातील महत्वाची मालिका
आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 ऍक्टिव्ह प्लेअर्स, ‘हा’ भारतीय फिरकीपटू टॉपवर