---Advertisement---

आरसीबीच्या हॅशटॅगला चेन्नईची जर्सी! ट्विटरकडून मोठी चूक होताच संघांकडून आल्या ‘या’ प्रतिक्रिया

On: शनिवार, एप्रिल 3, 2021 5:41 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून चेन्नईतून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता या हंगामासाठी केवळ आठवड्याभराचा कालावधी राहिल्याने भारतभरात या हंगामाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच ट्विटरनेही ही उत्सुकता लक्षात घेत संघांच्या नावाच्या आणि संघांच्या विशेष हॅशटॅगच्या पुढे त्या त्या संघाच्या जर्सीची इमोजी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यात ट्विटरने मोठी चूक केली आहे.

नक्की काय झाल?

ट्विटरने आयपीएल २०२१ साठी प्रत्येक संघांच्या हॅशटॅपुढे जर्सीच्या इमोजी दिली आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगोलर संघाच्या हॅशटॅगपुढे चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीचा इमोजी येत आहे; म्हणजेच जर ट्विटरवर #RCB किंवा #PlayBold असे टाकल्यास त्यापुढे चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीचा इमोजी दिसत आहे. ट्विटरकडून ही चूक झाल्याने सध्या याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Screengrab: Twitter
Screengrab: Twitter

संघांनी केले ट्विटरला ट्रोल

ट्विटरकडून इमोजीमध्ये चूक झाल्याने चेन्नई आणि बेंगलोर संघाने ट्विटरला ट्रोल केले आहे. चेन्नईने एक मीम शेअर करत ट्विट केले आहे की ‘ट्विटर राईट नाऊ’.

तसेच बेंगलोरने ट्विट केले आहे की ‘ट्विटर आणि ट्विटर इंडिया, असे वाटत आहे की तुम्हाला चांगल्या इंजिनियर्सची गरज आहे. बंगळुरु हे इंजिनियर शोधण्यासाठी चांगले ठिकाण आहे.’ या ट्विटमध्ये बेंगलोरने तुमच्या इमोजीला काय झाले आहे, अशा अर्थाचे हॅशटॅगही पुढे टाकले आहे.

याबरोबरच राजस्थान रॉयल्सनेही एक मीम शेअर करत ट्रोल केले आहे.

आयपीेएलच्या या १४ व्या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिलला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या सर्व संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

कोरोनामुळे बीसीसीआयला टेंशन; ‘या’ शहराची राखीव ठिकाण म्हणून निवड

कोहली-वॉर्नर सलामीवीर तर धोनी यष्टीरक्षक, पण हिटमॅनला केलं दुर्लक्षित; पाहा मॅक्सवेलची प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---