आयपीएल लिलाव कार्यक्रमातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘ह्युज एडमिड्स‘ यांची प्रकृती अचानक खालावल्याने ते चालू कार्यक्रमात कोसळले आहेत. (IPL auctioneer Hugh Edmeades collapses during the auction)
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1492419771023110146?s=20&t=p7IVEe8dUxwC_IVgdgV4dg
‘ह्युज एडमिड्स’ यांना नेमके काय झाले, याबाबत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांना भोवळ आली अथवा त्यांची तब्येत अचानक खालावल्याने ते चालू कार्यक्रमात बोली प्रक्रिया पार पाडत असतानाच कोसळले आहेत. त्यांना जमीनीवर कोसळताना पाहून सर्वांच्याच काळजात धस्स झाले असून. मेडिकल टीमद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (IPL auctioneer Hugh Edmeades collapses during the auction)
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1492421576448708612?s=20&t=jLDGFszgpM0A7cBSM5PWXA
आयपीएलचा मेगा लिलाव करणारे ह्युज एडमिड्स आहेत तरी कोण?
आयपीएल लिलावाची जबाबदारी खऱ्या अर्थाने ऑक्शनरवर असते. यामध्ये काही गफलत झाल्यास याचा तोटा सरळ संघांना भोगावा लागतो. त्याचसाठी बीसीसीआय जागतिक कीर्तीचे ऑक्शनर बोलावत असते. २००८ ते २०१७ या कालावधीत जगप्रसिद्ध ऑक्शनर रिचर्ड मेडली यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर २०१८ पासून आतापर्यंत ह्युज एडमिड्स हे काम पाहत आहेत.
लिलाव क्षेत्रामध्ये एडमिड्स यांचे मोठे नाव आहे. इंग्लंडचे रहिवासी असलेल्या एडमिड्स यांनी अनेक प्रसिद्ध वस्तूंचा लिलाव केला असून, यामध्ये ललितकला, धर्मादाय व अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. एडमिड्स यांनी जगभरात आतापर्यंत २५०० पेक्षा लिलावात भाग घेतला असून, यामधून त्यांनी अब्जावधींच्या वस्तूंची विक्री केली आहे. धर्मादाय लिलावासाठी ते न्यूयॉर्क, टोकियो, माँट्रीयल, पॅरिस अशा जगभरातील विविध ठिकाणी जात असतात.
हेही वाचा – वाचा आयपीएलचा मेगा लिलाव करणारे ह्युज एडमिड्स यांच्याबद्दल सर्वकाही
BCCI confirms "Auctioneer is stable, our medical team is checking him, he should be back for the next set from 3.30 pm IST".
— Johns. (@CricCrazyJohns) February 12, 2022
एडमिड्स यांच्याबाबत लेटेस्ट अपडेट…
ऑक्शनर ह्युज एडमिड्स हे बंगळुरुमध्ये लिलावाच्या चालू कार्यक्रमात कोसळले. मात्र, आता त्यांच्या कोसळण्याचे कारण समोर आले असून त्यांना भोवळ आल्याचे समजत आहे. तसेच, त्यांची तब्येत देखील ठिक असल्याची माहिती समोर येत आहे. आणि लिलाव प्रकिया दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. (Auctioneer Hugh Edmeades collapses during IPL auction)
अधिक वाचा
‘पर्पल पटेल’चा वाढला भाव; ज्या आरसीबीने २० लाखांना घेतले होते विकत, त्यांनीच यंदा मोजले ‘इतके’ कोटी
‘किंग खान’च्या अनुपस्थितीत मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाची लिलावाला हजेरी, फोटो तुफान व्हायरल