आशिया चषक 2023चा चौथा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. रविवारी (3 सप्टेंबर) या सामन्यात मेहदी हसन मिराज आणि नजमूल हुसैन शांतो यांनी बांगलादेशसाठी धमाकेदार खेळी केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेहदी हसनने 112, तर नजमूलने 104 धावा केल्या. या दोघांच्या महत्वपूर्ण खेलीमुळे बागंलादेशची धावसंख्या 50 षटकात 334 पर्यंत पोहोचली.
अफगाणिस्तान संघापुढे विजयासाठी तब्बल 335 धावांचे लक्ष्य आहे. मेहदी सहन मिराज (Mehidy Hasan Miraz) तब्बल पाच वर्षांनंतर बांगलादेशसाठी वनडे सामन्या सलामीवीर म्हणून खेळला. यापूर्वी आशिया चषख 2018 मध्ये त्याने सलामीवीर म्हणून खेळी केली होती. त्यानंतर दरम्यानचा पाच वर्षात एकदाही वनडे क्रिकेटमध्ये त्याला 6व्या क्रमांकाच्या आधी संधी मिळाली नव्हती. मात्र, रविवारी (3 सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध त्याने मिळालेल्या या संधीचे सोने केले. त्याने अवघ्या 115 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केला. त्याला साथ मिळाली ती म्हणजे नजमूल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) याची. नजमूलने 101 चेंडूत 100 धावा कुटल्या. नजमूलने आशिया चषक 2023च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 89 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.
मेहदी हसन आणि नजमूलमध्ये या सामन्यात 194 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे बांगलादेश संघही 300 पेक्षा अधिक धावांपर्यंत मजल मारू शकला. मोहम्मद नईम (28), तिसऱ्या क्रमांकावरील तौहीद ह्रदोय (0), मुशफिकूर रहीम, (25), हे महत्वाचे खेळाडू संघासाठी मोठी खेळी करू शकले नाहीत. शमीम हुसेन देखील 11 धावा करून धाबवाद झाला. (Hundreds from Mehidy Hasan Miraz and Najmul Shanto help Bangladesh post a colossal total)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
बांगलादेश – मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
अफगाणिस्तान- रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, करीम जनात, रशीद खान, फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! तिन्ही फॉरमॅट जावणारा पाकिस्तानी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! शेअर केली सविस्तर पोस्ट
‘या’ 2 भारतीय धुरंधरांनी वर्ल्डकपमध्ये घेतलीय हॅट्रिक, कोण आहेत ते?