नागपुर | शेष भारत विरुद्ध विदर्भ इराणी ट्राॅफी सामन्यात आज हनुमा विहारीने शानदार शतकी खेळी केली. त्याने १९७ चेंडूचा सामना करताना नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.
विशेष म्हणजे त्याने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. पहिल्या डावात शेष भारत संघाकडून खेळताना त्याने ११४ धावांची खेळी केली होती.
यामुळे इराणी ट्राॅफी स्पर्धेत दोन्ही डावात शतकी खेळी करणारा तो शिखर धवननंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. धवनने २०११मध्ये शेष भारताकडून खेळताना राजस्थानविरुद्ध दोन्ही डावात शतकी खेळी केल्या होत्या.
हनुमा विहारीने गेल्यावर्षीही विदर्भाविरुद्ध खेळताना दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. यामुळे इराणी ट्राॅफीत सलग तीन सामन्यात शतकी खेळी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
Back to back tons for @Hanumavihari. Getting the run registers ringing and how! ???????????? #IraniCup #ROIvVID pic.twitter.com/Q9pjezMlTd
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 15, 2019
सध्या शेष भारताकडे ११९ धावांची आघाडी असून कर्णधार अजिंक्य रहाणे ७४ तर हनुमा विहारी १०४ धावांवर खेळत आहे. सामन्याचा आजचा चौथा दिवस असून दिवसातील शेवटचे सत्र सुरु आहे.






