fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हा दिग्गज म्हणतो, पाकिस्तानच्या या क्रिकेटपटूकडे विराट, स्मिथची बरोबरी करण्याची क्षमता

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसीने पाकिस्तान क्रिकेटपटू बाबर आझमचे कौतुक केले आहे. हसी म्हटले आहे की आझम हा एक प्रतिभाशीली क्रिकेटपटू असून त्याच्याकडे विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथशी बरोबरी करण्याची क्षमता आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या टी20 मालिकेत बाबरने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि आता कसोटी मालिकेतही हा फॉर्म कायम राखण्या ठेवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

हसीचे म्हणणे आहे की आझमने त्याचा खेळ सुधारला तर तो, कोहली, स्मिथ, केन विलियम्सन, तो त्याच्या यादीत स्थान मिळवू शकतो.

फॉक्स स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार हसी म्हणाला, “मला विश्वास आहे की जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत नाव आणण्याची क्षमता आझममध्ये आहे.’

‘मला वाटते की जर सराव सामन्यातील शतकाप्रमाणे कसोटीतही काही मोठी शतके तो ठोकू शकला तर तो ही शानदार आणि एक चांगला खेळाडू ठरु शकतो,’ असे हसी म्हणाले.

बाबार आझमने नुकतेच ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात 157 धावांची दिडशतकी खेळी केली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 21 नोव्हेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.

You might also like