सनराइजर्स हैदराबाद संघ त्यांच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा संघासाठी डावाची सुरुवात धमाकेदार पद्धतीने करतात. तसेच हेनरिक क्लासेन सुद्धा मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करतो. यावेळी संघामध्ये उजव्या हाताचा फलंदाज ईशान किशन सुद्धा सामील आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला पूर्ण विश्वास आहे की, ते यावेळी आयपीएलच्या हंगामात इतिहास रचतील. जे ते मागच्या हंगामापासून बनवत आले आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मीडिया सोबत बोलताना दावा करत आहे की, या हंगामात त्यांचा संघ 300 पर्यंत स्कोर करेल.
आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये हैदराबाद संघाची फलंदाजी मागच्या हंगामाच्या तुलनेत खूप जास्त मजबूत दिसत आहे. तसेच मागच्या हंगामात संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या करून इतिहास रचला होता. आता आयपीएल मधील सर्वात मोठी धावसंख्या 287 धावा आहे, जी सनरायजर्स हैदराबाद संघाने आरसीबी विरुद्ध केली होती. तसेच दुसरी मोठी धावसंख्या सुद्धा हैदराबाद संघाचीच आहे, जेव्हा त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध 277 धावा केल्या होत्या. या दोन्ही धावसंख्या त्यांनी मागच्या हंगामात केलेल्या आहेत.
आयपीएल 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबाद त्यांचा पहिला सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळत आहेत. या सामन्यात पहिल्यांदा ट्रेविस हेड, कर्णधार पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, मोहम्मद शमी यांनी सनरायजर्स हैदराबादने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता, यादरम्यान मीडियाने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी इशारा करत म्हटले आहे की, त्यांचा संघ या हंगामात 300 धावा पार करेल.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करत आहेत. यामध्ये ट्रैविस हेड आणि अभिषेक शर्माने संघासाठी चांगली सुरुवात केली आहे. तसेच अभिषेक शर्मा 11 चेंडूत 24 धावा करून बाद झाला आहे. त्याने हेड सोबत मिळून 3 षटकात 45 धावांची भागीदारी केली.