हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.
कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग?
या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.
कसा असेल स्पर्धेचा कार्यक्रम?
ह्या स्पर्धेचा उदघाटन समारंभ ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे संघ असणार आहेत. नॉकआऊट अर्थात बाद फेरीचे सामने नवीन वर्षात अर्थात ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत.
कोण आहे आयोजक?
ही स्पर्धा भारतीय कबड्डी महासंघ आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ तेलंगणाच्या मान्यतेने होणार असून आणि तेलंगणा राज्य कबड्डी संघटना आणि तेलंगणा राज्य ऑलिम्पिक असोशिएशन याचे आयोजक आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्य वेगळे झाल्यापासून प्रथमच येथे एवढी मोठी कबड्डीची स्पर्धा होत आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येतील हे सामने?
साखळी फेरीचे सामने कोणत्याही चॅनेलवर पाहण्याची कबड्डीप्रेमींना संधी मिळणे अवघड आहे तरीही तेलंगणा मधील काही चॅनेल याचे प्रक्षेपण करू शकतात. बाद फेरीचे सामने मात्र स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सच्या अन्य चॅनेलवर चाहत्यांना पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे ३ ते ५ डिसेंबर या काळातील पुरुष आणि महिलांचे सर्व सामने हे या चॅनेलवर दाखवले जाणार आहे.
Video: