आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तसेच उद्या म्हणजेच 23 मार्च रोजी स्पर्धेतील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. सनरायजर्स हैदराबाद तोच संघ आहे. ज्याने मागच्या हंगामात तीन वेळा 250 धावांचा आकडा पार केला होता आणि आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम सामना सुद्धा खेळला होता. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघ आहे, ज्याने प्लेऑफ मध्ये मागच्या हंगामात त्यांचे स्थान पक्के केले होते.
येथे जाणून घ्या की, हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्यात खेळपट्टी कशी असणार आहे, याचबरोबर संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते आणि कोणता संघ विजयी होऊ शकतो?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते. या स्टेडियमवर मोठ- मोठी धावसंख्या केली जाते. मागच्या हंगामात याच मैदानावर हैदराबाद संघाने 277 धावांचा आकडा उभा केला होता. तसेच ही धावसंख्या या मैदानावरील आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या आहे. या मैदानावर आत्तापर्यंत 77 आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये 34 वेळा फलंदाजी आणि 43 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे.
हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघ आत्तापर्यंत आयपीएलच्या इतिहासात20 वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये 9 वेळा राजस्थान आणि 11 वेळा हैदराबाद संघ विजय ठरला आहे. पहिल्या 3 सामनांमध्ये सातत्याने राजस्थान संघाला हैदराबाद कडून पराभव पत्करावा लागला होता. राजीव गांधी स्टेडियममध्ये दोन्ही संघात 5 सामने खेळण्यात आले आहेत, ज्यामध्ये 4 सामने हैदराबादने जिंकले आहेत. आकडे सांगतात की सनरायजर्स हैदराबाद संघ यावेळीही राजस्थानचा पराभव करू शकतो.
SRH ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, वियान मुल्डर, पॅट कमिंस, हर्षल पटेल, राहुल चाहर, मोहम्मद शमी
RR ची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, ध्रुव जुरेल, शुभम दुबे, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, संदीप शर्मा