रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे माजी डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशंस माईक हेसन यांंनी मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल आरसीबीचा महत्वाचा खेळाडू होता. पण फ्रँचायझीने त्याला रिलीज केल्यानंतर फिरकीपटू गोलंदाज चांगलाच नाराज झाला होता. माईक हेसनच्या माहितीनुसार चहलने त्यावेळी फोनवर बोलणेही टाळले होते.
आरसीबीचा माजी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मैदानात नेहमीच चर्चेत असतो. मुंबई इंडियन्सकडून त्याने आयपीएल पदार्पण केले होते. पण चहलला अपेक्षित संधी आणि ओळख आरसीबीमध्येच मिळाली. आरसीबीकडून आयपीएलमध्ये खेळताना त्याने अनेक दिग्गजांच्या विकेट्स घेतल्या. तसेच संघाचा प्रमुख गोलंदाज देखील बनला. आयपीएल प्रदर्शनाच्या जोरावरच चहलने भारतीय संघातही स्थान मिळवले आणि नाव केले. असे असले तरी, आयपीएल 2022 (IPL) हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी आरसीबीने चहलला रिलीज केले. लिलिवात आरसीबीकडून चहलला खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण अखेरची बोली राजस्थान रॉयल्सने लावली आणि 6.5 कोटी रुपयांमध्ये चहलला खरेदी केले.
माईक हेसन यांच्या मते आरसीबीने चहलला लिलिवात खरेदी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण फिरकीपटू त्यांच्या संघात पुन्हा जोडला जाऊ शकला नाही. चहलला दुसऱ्या फ्रँचायझीने खरेदी केल्यानंतर हेसनने त्याला फोन केला, पण तो खूपच निराश होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हेसलने चहलला केलेल्या फोन कॉलविषयी माहिती दिली.
माईल हेजल म्हणाला, “मला लक्षात आहे की, मी चहलला कॉल केला होता आणि तो नाराज होता. त्यावेळी लिलावाचे समीकरण समजून घेणे त्याच्यासाठी खूपच कठीण होते. तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. यासाठी मी त्याला जराही दोष देत नाहीये. तो मनाने आरसीबीसोबत जोडला गेलेला होता. त्यामुळे संघात निवड न झाल्याने तो खूप नाराज झाला होता. पण मी एवढे सांगू शकतो की, चहलला संघाची स्थिती काय आहे, हे माहीत होते.”
तत्पूर्वी चहलने देखील आरसीबीतून वगळले गेल्यामुळे फ्रँचायझीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने फ्रँचायझीवर असा आरोप केला होता की, “संघातून रिलीज करण्याआधी एकदाही त्याला विचारले किंवा सांगितले गेले नव्हते.” (‘I called him but…’, what happened in RCB after releasing Chahal?)
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy 2024 । उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, एका क्लीकवर मिळवा सर्व अपडेट
लोकसभा निवडणुकीसाठी शुबमन गिलवर मोठी जबाबदारी, नव्या भूमिकेत दिसणार युवा फलंदाज