भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. 32 वर्षीय रैनाने भारताकडून शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध जूलै 2018 मध्ये खेळला आहे.
आता रैनाने 2020 आणि 2021 ला होणाऱ्या टी20 विश्वचषकांसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
78 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1605 धावा केलेला रैना द हिंदूशी बोलताना म्हणाला, ‘मी भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. मी याआधी त्याजागेवर फलंदाजी केली आहे आणि चांगली कामगिरी केली आहे. मी येणाऱ्या टी20 विश्वचषकांसाठी संधीची वाट पाहत आहे.’
भारताने याआधीही मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये रिषभ पंतला भारताने चौथ्या क्रमांकावर खेळवले आहे. पण रिषभला छाप सोडण्यात अपयश आले आहे.
रैना पंतबद्दल म्हणाला, ‘तो थोडा गोंधळलेला वाटतो. तो त्याचा नैसर्गिक खेळ करत नाही. तो एकेरी धाव काढण्याचा आणि चेंडू रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो हरवलेला वाटतो.’
‘ज्याप्रमाणे एमएस धोनी खेळाडूंशी संवाद साधायचा तसे कोणीतरी त्याच्याशी बोलले पाहिजे. क्रिकेट हा मानसिक खेळ देखील आहे आणि पंतला त्याचा आक्रमक खेळ करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. सध्या तो काही सूचनांच्या नुसार खेळत असल्यासारखे वाटत आहे, जे त्याच्यासाठी काम करत नसावे.’
याबरोबरच रैना धोनीबद्दल म्हणाला, ‘तो अजून फिट आहे, अजूनही चांगला यष्टीरक्षक आहे आणि दिग्गज फिनिशर आहे. पुढील टी20 विश्वचषकासाठी धोनी भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
-या मोठ्या कारणामुळे एमएस धोनी टीम इंडियापासून दूर…
-या महिन्यात होणार आयपीएल २०२०चा लिलाव
–क्रिस्तियानो रोनाल्डो की लियोेनेल मेस्सी? विराट कोहलीने घेतले ‘हे’ नाव