यावर्षी ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या देशात २०२१ टी२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे काही महिन्यांवर आलेल्या या मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वच देश तयारीला लागले आहेत. त्यामुळे सध्या अनेक संघ टी२० सामने खेळताना दिसत आहेत. तसेच या स्पर्धेच्या विजेत्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे सध्या अनेक दिग्गज खेळाडू विविध मते या स्पर्धेबाबत व्यक्त करत आहेत.
नुकतेच माजी खेळाडू आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांनी भारतीय संघाबद्दल कोणतीही खात्री नसल्याचे म्हटले आहे.
डब्ल्यू व्ही रमण यांनी सांगितले की नेहमी दबावात राहून क्रिकेट सामना जिंकता येत नाही. रमण यांना विचारले गेले होते की, विराट कोहली आयसीसी ट्रॉफी जिंकू शकतो का? त्यावर रमण म्हणाला, ‘मी विश्वासपूर्ण सांगू शकत नाही की विराट ट्रॉफी जिंकेल की नाही. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात तिन्ही प्रकारांत चांगली कामगिरी केली आहे. पण आपण विचार केला तर भारतीय संघाकडे टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी चांगली संधी आहे.’
डब्ल्यू व्ही रमण म्हणाले, ‘टी20 हा असा प्रकार आहे, जिथं कोणीही सांगू शकत नाही, की पुढे काय होईल. एका षटकात प्रत्येक गोष्ट बदलते. हेच या खेळाचे सौंदर्य आहे. तुम्ही अव्वल क्रमांकाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकविचला पाहा. यावर्षी तो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकही जिंकू शकला नाही. तो यावर्षी चांगल्या फॉर्ममधे सुद्धा होता. या गोष्टी उच्च स्तरावरील खेळात होत असतात. साधारणता आपण अंदाज लावू शकत नाही की क्रिकेटमध्ये काय होईल, विशेषकरून टी-20 मध्ये, कोण अन्य जिंकेल की विराट जिंकेल. या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही विराटच्या कर्णधार पदाच्या कारकीर्दीतील आकडे पाहिले तर त्याचे यश अप्रतिम आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषक जिंकू शकतो’.
हा टी20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अशी २ कारणे, ज्यामुळे नॉटिंघम कसोटीत अश्विनला मिळायला पाहिजे होती संधी
टी-ट्वेंटी वर्ल्डकपचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहाता येणार का? पाहा काय म्हणतायेत आयोजक
कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत