---Advertisement---

PBKS vs MI: महत्वाच्या सामन्यात पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक निराश, सांगितली नेमकी चूक कुठे झाली!

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) क्वालिफायर 2 सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळण्यात आला. (Mumbai Indians vs punjab kings qualifier2) या सामन्यात पंजाबने विजय मिळवत फायनलमध्ये त्यांचे स्थान निश्चित केले. तसेच या पराभवानंतर मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाचा या हंगामातील प्रवास इथेच संपला आहे. पंजाबचा अंतिम सामना आरसीबी सोबत (3 जून) रोजी होणार आहे. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्या (Hardik pandya) खूप निराश दिसून आला. याशिवाय हार्दिकने पराभवाचे कारण देखील स्पष्ट सांगितले आहे.

महत्त्वाच्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर (mumbai indians captain Hardik pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटले आहे की, श्रेयसने ज्या प्रकारे फलंदाजी केली, ज्या प्रकारे त्याने शॉट्स खेळले ते खूप चांगले होते. मला वाटते की, त्याने खरचं खूप छान फलंदाजी केली. हा सामना बरोबरीचा झाला पण गोलंदाजीच्या दृष्टीने चांगले प्रदर्शन करणे गरजेचे होते. मला वाटते की, मोठ्या सामन्यांमध्ये हे नक्कीच महत्त्वाचे ठरते. आणि जसं आम्ही सांगितलं की तो शांत होता, त्यांनी आम्हाला दबावात ठेवले आणि मला वाटते ज्याप्रकारे आम्हाला प्रदर्शन करायचं होतं त्या प्रकारे आम्ही करू शकलो नाही.

पुढे हार्दिक म्हणाला, योग्य प्रकारे गोलंदाजी योग्य गोलंदाजाकडून केली असती तर कदाचित निर्णय वेगळा असता. मागे वळून पाहिलं तर काही गोष्टी आमच्या बाजूने असत्या. जसप्रीतला परिस्थितीचा अंदाज होता, जर 18 चेंडू उरले आहेत आणि जसप्रीत-जसप्रीत चाहते म्हणत आहेत, तर तो काहीतरी खास करू शकतो. पण आज असे झाले नाही.

या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयसने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात श्रेयसने शानदार फलंदाजी करत 41 चेंडूत 87 धावा केल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 8 षटकार सामील होते. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार (player of the match) देखील देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---