दक्षिण आफ्रिका संघाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका नावावर केली. कसोटी मालिकेत दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही बांगलादेशने जिंकले. दक्षिण आफ्रिका संघाने ही मालिका जरी जिंकली असली, तरी संघाला यादरम्यान त्यांच्या प्रमुख खेळाडूंची साथ मात्र मिळाली नाही. संघाचे अनेक महत्वाचे खेळाडू कसोटी मालिकेवेळी भारतात आयपीलएल खेळत होते. आता याच पार्श्वभूमीवर कर्णधार डीन एल्गरने मोठे वक्तव्य केले आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून (South Africa Cricket Board) खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकी संघाचे जवळपास सर्व महत्वाचे फलंदाज आयपीएलसाठी भारतात दाखल झाले. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत आफ्रिकी संघ त्यांच्या युवा खेळाडूंसह मैदानात उतरला आणि विरोधी संघ क्लीन स्वीप देत मालिका नावावर केली. मालिका नावावर केल्यावर कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) म्हणाला की, “मला माहीत नाहीये की, ज्या खेळाडूंनी कसोटी मालिका सोडली होती, त्यांना पुन्हा संघात निवडले जाईल की नाही. ही गोष्ट माझ्या हातात नाहीये.”
बांगलादेशविरुद्धच्या या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचे कागिसो रबाडा, मार्को जेन्सेन, लुंगी एन्गिडी, एन्रीच नॉर्किया, रस्सी व्हॅन डर ड्युसनने आणि ऍडम मार्करम हे महत्वाचे खेळाडू उपलब्ध नव्हते. कारण, हे सर्वजण आयपीएल २०२२साठी भारतात दाखल झाले आहेत. आयपीएलच्या तुलनेत या खेळाडूंनी राष्ट्रीय संघाला कमी प्राथमिकता दिल्याचे दिसले. जे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतात आले आहेत, त्यापैकी फक्त एकट्या ऍडम मार्करमला संघात संधी दिली गेली आहे. एन्गिडीला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
बांगलादेश आणि दक्षिण अफ्रिकेतील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिल्या कसोटीत आफ्रिका संघाने २२० आणि दुसऱ्या कसोटीत ३३२ धावांनी विजय मिळवला. पहिल्या कसोटीच्याच्या शेवटच्या डावात बांगलादेश संघ ५३ धावांवर सर्वबाद झाला होता. तसेच, दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या डावात बांगलादेश ८० धावांवर गुंडाळला गेला. एल्गरने कसोटी मालिकेत ५६.७५ च्या सरासरीने २२७ धावा केल्या. तो एकमेवर फलंदाज ठरला ज्याने या मालिकेत २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. तसेच, फिरकी गोलंदाज केशव महाराजने मालिकेत सर्वाधिक १६ विकेट्स घेतल्या.