---Advertisement---

दिग्गज लेगस्पिनर म्हणतोय, ‘विश्वचषकासाठी संघात चहल नाही कुलदीप हवा’

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 7:30 PM
Kuldeep Yadav Yuzvendra Chahal
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याच दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल. भारतातच होणाऱ्या या विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाचा समावेश असावा याबाबत नियोजन सुरू होणार आहे. भारताचे माजी फिरकीपटू व समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या विश्वचषकासाठी सध्या भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या युजवेंद्र चहल याच्या जागी चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याला पसंती दिली आहे.

युजवेंद्र चहल हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याला सर्वांच्या आधी संधी दिली जाते. मात्र, नजीकच्या काळात त्याची कामगिरी तितकीशी प्रभावी झालेली नाही. टी20 विश्वचषकात त्याला संधी मिळाली नव्हती. तर, न्यूझीलंड दौऱ्यावर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.‌ त्यामुळे त्याच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचवेळी लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी ‌‌आपण पुढील विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव याला पाहू इच्छित आहे असे म्हटले. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,

“हा विश्वचषक भारतात होणार आहे. आपण अपेक्षा करू की इथे फिरकीपटूंना मदत करणारी खेळपट्टी मिळेल. मात्र, फलंदाजांना पूरक खेळपट्टी मिळाल्यास मी युजवेंद्र चहलच्या आधी कुलदीप यादव याला संधी देईल. कारण अशावेळी तुम्हाला चेंडूला अधिक वळवणारे गोलंदाज हवे असतात. माझ्यामध्ये तसा गोलंदाज चहल नाही. त्याचे चेंडू म्हणावे तसे वळत नाहीत. त्यामुळे माझा त्या विश्वचषकातील गोलंदाज कुलदीप यादव असेल.”

चहल सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा गोलंदाज आहे. दुसरीकडे एकवेळी चहलसोबत विरोधी संघांना नाकीनऊ आणणारा कुलदीप भारतीय संघातून बाहेर आहे.

(I choose Kuldeep over chahal in odi World Cup Laxman Shivramkrishnan Said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली
नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---