भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने नोव्हेंबर 2008 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध नागपूर येथे कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्याआधी गांगुलीने निवृत्तीची घोषणा करत हा कारकिर्दीतील शेवटचा सामना असल्याचे सांगितले होते. पण गांगुलीसाठी खास क्षण आता तो नागपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा भारतीय संघाने त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.
शेवटच्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर पकड मिळवली होती; विजय भारतीय संघाच्या दृष्टीक्षेपात आला होता. त्यावेळी भारतीय संघाने दुसऱ्या सत्रात गांगुलीला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला होता.
या शेवटच्या सामन्याच्या आठवणींना गांगुलीने बीसीसीआयच्या ‘ओपन नेट्स विथ मयंक’ या शोमध्ये बोलताना उजाळा दिला आहे. या शोचा होस्ट असलेल्या मयंक अगरवालने गांगुलीला काही फोटो दाखवले आणि त्याबद्दल बोलण्यास सांगितले. यावेळी त्याने गांगुलीला निवृत्तीच्या सामन्यात मिळालेल्या गार्ड ऑफ ऑनरचा फोटोही दाखवला.
निवृत्तीच्या कसोटीमधील या फोटोबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ‘माझी नागपूरमधील शेवटची कसोटी. हा फोटो शेवटच्या दिवसातील शेवटच्या सत्राचा आहे. मी विदर्भ स्टेडियममध्ये प्रवेश करत होतो आणि माझे संघसहकारी माझ्या बाजूने उभे होते. त्यांनी मला आधी मैदानात जाऊ दिले.’
यानंतर मयंकने गांगुलीला त्या क्षणाबद्दल विचारले, जेव्हा त्या कसोटीतील भारताचा कर्णधार एमएस धोनीने गांगुलीला सामन्याच्या शेवटच्या काही षटकांसाठी नेतृत्व करण्यास सांगितले होते. ही गांगुलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला तसेच त्याच्यातील कर्णधाराला दिलेली मानवंदना होती.
धोनीच्या त्या निर्णयाबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ‘ते (काही षटकांसाठी दिलेले नेतृत्व) माझ्यासाठी आश्चर्यचकित करण्यासारखे होते. मी त्याची अपेक्षा केली नव्हती. पण एमएस धोनी हा एमएस धोनी आहे. तो नेतृत्व करताना अनेकदा आश्चर्याचे धक्के देत असतो. आम्ही तो सामना जिंकत होतो आणि माझ्या मनात निवृत्तीचा विचार होता. मला माहित नाही मी त्या 3-4 षटकात काय केले.’
#HappyBirthdayDada#DadaOpensWithMayank
The most awaited episode is out. DO NOT MISS this special segment where @mayankcricket gets @SGanguly99 to reveal some of the most fascinating behind the scenes stories.
🎬🎥 https://t.co/RDNhQoP6pA pic.twitter.com/7vk0NTREmV
— BCCI (@BCCI) July 7, 2020
त्या सामन्यात भारताने 172 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यानंतर गांगुलीने भावनिक होत भारतीय क्रिकेटला अलविदा केले.
ट्रेंडिंग घडामोडी –
चाहत्यांनी दादाचा वाढदिवस केला खास अंदाजात साजरा; पाहून व्हाल थक्क
कोरोनाचा फटका बसणार या ३ क्रिकेटरला, कमबॅक राहणार केवळ एक स्वप्न
अनुष्का शर्माचे बिकीनवरील फोटोशूट पाहून विराट कोहली झाला क्लीन बोल्ड, पहा फोटो