भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे झाला. या कसोटीमध्ये आफ्रिका संघ 7 विकेट्सने विजयी झाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या दक्षिण आफ्रिकेच्या विजयामध्ये सर्वात मोलाची कामगिरी होती, ती म्हणजे कर्णधार डीन एल्गर याची. त्याने भारताने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 96 धावांची खेळी केली.
या विजयानंतर एल्गर म्हणाला की, “क्रिकेट सामना जिंकण्याचा योग्य किंवा अयोग्य मार्ग कोणता आहे, हे मला माहीत नाही, पण ते मूलभूत गोष्टींबाबत आहे. मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्यासाठी आम्ही सर्व गोष्टी योग्य केल्या. आता अधिक आत्मविश्वासाने केपटाऊनला जाणार आहे. आमच्यासाठी हे सोपे काम नव्हते. या विजयाचे श्रेय आमच्या गोलंदाजांनाही जाते की, त्यांनी घेतलेली मेहनत खूपच प्रभावी होती.”
एल्गर पुढे म्हणाला की, “मला अजून दुखापतीच्या खुणा दिसत नाहीत, पण माझ्या देशासाठी जाऊन खेळणे ही मोठी प्रेरणा आहे. मी जे काही करत आहे, ते मोठे चित्र पाहणे महत्त्वाचे आहे आणि मोठे चित्र म्हणजे माझ्या देशासाठी सामने जिंकणे. चार दिवसांत अशी कामगिरी केली की वेदना विसरता येतात. आमच्या फलंदाजांची खूप कसोटी लागली. या सामन्यात आमची फलंदाजी संघर्षमय असल्याचे दिसून आले.”
अधिक वाचा – ‘कॅप्टन्स नॉक’ खेळत एल्गर ‘त्या’ यादीत पोहोचला दुसऱ्या स्थानी
दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच सामन्यात एक धक्का बसला होता. तो म्हणजे क्विंटन डी कॉक या माजी कर्णधाराने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली होती. दक्षिण आफ्रिका संघ संघर्ष करत असताना क्विंटन डी कॉकची निवृत्ती सर्वांना आश्चर्यचकीत करणारी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्ग कसोटी जिंकत या धक्क्यातून ते सावरल्याचे दाखवून दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
राडाच ना! भर मैदानात एल्गर-सिराज भिडले, वाद थांबवण्यासाठी कर्णधार केएल राहुलचा हस्तक्षेप
रहाणे-पुजाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला भारतीय दिग्गज; म्हणाला…
व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज