श्रीलंकेचा आक्रमक फलंदाज आणि १९९६ सालचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाचे हे वाक्य ऐकून अनेक जणांना धक्का बसेल. अर्जुन रणतुंगा श्रीलंका क्रिकेटला अक्षरशः विटलेला आहे आणि सध्याच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे श्रीलंकेचे सामने अजिबात पहात नाही.
सध्या भारताचा श्रीलंका दौरा असून ते ३ कसोटी सामने, ५ एकदिवसीय आणि एक १ टी-२० असे खेळणार आहेत. पण रणतुंगा हे सामने न बघता सध्या सुरु असलेल्या इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका मालिकेचे सामने पहाण्यास प्राधान्य देतो.
रणतुंगाने श्रीलंकेसाठी ९३ कसोटी सामन्यात ५१०५ धावा केल्या आहेत तर २६९ एकदिवसीय सामन्यात तब्बल ७४५६ इतक्या धावा केल्या आहेत. श्रीलंकाचे सध्याचे खेळाडू केवळ विदेश दौरे, खेळाबरोबर मिळणारी रक्कम यावर भर देत असून देशासाठी जिंकण्याची जिद्द कमी पडत आहे.
५२ वर्षीय रणतुंगा आता पंतप्रधान राणील विक्रमसिंघे आणि राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्याशी चर्चा करून क्रिकेट प्रशासनात फेर बदल करण्याबाबत सल्ला घेणार आहेत.