आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीनं खळबळ माजवणारा वेगवान गोलंदाज संदीप शर्मानं मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये त्याला आणखी एक संधी मिळाल्याचं श्रेय त्यानं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिलं. संदीप शर्माच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो आयपीएल 2023 मध्ये विकला गेला नव्हता, तेव्हा संजू सॅमसननं त्याला कॉल केला आणि सांगितलं की तो देखील यामुळे निराश झाला आहे.
जर आपण संदीप शर्माबद्दल बोललो तर, आयपीएल 2023 च्या लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर राजस्थान रॉयल्सनं संदीपचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला. हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध कृष्णा दुखापतीचा बळी ठरला, ज्यानंतर संदीप शर्माला बदली म्हणून राजस्थान रॉयल्स संघात आला. व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य असल्याचं संदीपनं आपल्या कामगिरीनं दाखवून दिलं. आयपीएल 2023 मध्ये त्यानं 12 सामन्यात 10 विकेट घेतल्या. तर आयपीएल 2024 मध्ये त्यानं 11 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याच्या गोलंदाजीचंही खूप कौतुक झालं.
संदीप शर्मानं अलीकडेच एका पॉडकास्ट दरम्यान सांगितलं की, लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर संजू सॅमसन त्याच्याशी बोलला आणि सांगितलं की त्याला अजूनही संधी मिळू शकते. संदीप म्हणाला, “मला संजू सॅमसनचा फोन आला. तो माझ्याशी बोलला. त्यानं मला अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या. सॅमसननं सांगितलं की, मी अनसोल्ड राहिल्यामुळे त्याला वैयक्तिकरित्या खूप वाईट वाटलं.”
संदीपनं पुढे सांगितलं की, “सॅमसन म्हणाला प्रत्येक संघ दुखापतींशी झुंजत आहे. राजस्थान रॉयल्सलाही ही समस्या आहे. तो म्हणाला की, मी आयपीएलमध्ये खेळेन आणि चांगली कामगिरी करेन. संजू सॅमसनचं बोलणं मला सकारात्मक वाटलं. यामुळे मला खूप मदत झाली. यानंतर सॅमसननं मला राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये बोलावलं. दुर्दैवाने प्रसिद्ध कृष्णा जखमी झाला आणि मला संधी मिळाली. तेव्हापासून मी प्रत्येक सामन्यात खेळत आहे आणि त्याचा पुरेपूर आनंद घेत आहे.”
हेही वाचा –
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर मोठी खेळाडू!
धोनी की रोहित, चांगला कर्णधार कोण? अवघड प्रश्नावर वर्ल्ड कप विजेता गोंधळला!
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा संताप! एअर इंडियावर उघडपणे व्यक्त केला राग