भारताचा माजी सलामीवीर आणि स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या विरेंद्र सेहवाग नेहमीच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता त्याच्या तडाखेबाज फलंदाजीचे रहस्य अखेर स्वत:च त्याने सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की, तो वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी असे करायचा.
सेहवागने (Virender Sehwag) स्पोर्टस १८९च्या होम ऑफ हिरोज या कार्यक्रमामध्ये बोलताना त्याने आपण इतर भारतीय फलंदाजांपेक्षा कमी चेंडूमध्ये जलद धावा करण्याचे लक्ष्य ठेवून आपण वेगळे का आणि हे कशासाठी आहेत हे स्पष्ट केले. “सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली हे १५०-२०० चेंडूमध्ये त्यांचे शकत पूर्ण करत असत. यांच्यामध्ये माझी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मी जलद धावा करत होतो”, असे सेहवागने या कार्यक्रमात म्हटले आहे.
“दिवसाच्या अखेरपर्यंत जर मी फलंदाजी करत असेल, तर मला २५० धावा काढणे आवश्यक होते. यासाठी मला ताबडतोब फलंदाजी करून १००, १५०, २०० धावा करणे जरूरी होते. त्याकाळी चेंडू सीमापार पाठवण्यासाठी माझ्यावर दबाव नसल्याने मी १०० पेक्षा अधिक धावा करण्यावर भर देत होतो”, असेही पुढे सेहवागने म्हटले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा नफजगडचा नवाब म्हणून ओळख जाणारा सेहवाग निवृत्तीनंतरही सोशल मिडीयावर त्याच्या मिश्कील विधानाने नेहमीच चर्चेत असतो. या कार्यक्रमामध्ये बोलताना सेहवागने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्यावरही हल्लाबोल केला.
सेहवागने त्याच्या कारकिर्दीत १०४ कसोटी सामने खेळले असून ८५८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर २५१ वनडेत त्याने ८२७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने कसोटीत ४० आणि वनडेत ९६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळले असून ३९४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! प्रियम गर्गने घेतलेला हवाई कॅच पाहून घालाल तोंडात बोट, Video व्हायरल
IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’
उमरान मलिकने मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स घेत बुमराहला पछाडलं, ‘या’ विक्रमात बनला अव्वल