जून-जूलै 2019मध्ये आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताला न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य सामन्यात 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. हा पराभव अनेक क्रिकेट चाहते अजूनही विसरलेले नाही.
तसेच या सामन्यात भारताला विजयासाठी केवळ 24 धावांची आवश्यकता असताना यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी(MS Dhoni) धावबाद झाल्याने भारताच्या सामना जिंकण्याच्या आशाही धूसर झाल्या होत्या. त्या सामन्यात 49 व्या षटकात धोनीला मार्टिन गप्टिलने स्टम्पवर थेट चेंडू फेकत धावबाद केले होते.
इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत या धावबाद होण्याबद्दल धोनी म्हणाला, ‘मी माझ्या पहिल्या सामन्यात धावबाद झालो आणि या सामन्यात पण धावबाद झालो. मी स्वत:ला सांगत असतो की मी डाइव्ह (उडी) का नाही मारली. मी स्वत:ला सांगत असतो की फक्त 2 इंच, मी डाइव्ह करायला हवे होते.’
विश्वचषकाच्या त्या उपांत्य सामन्यात धोनीच्या धावबाद होण्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकला होता. धोनी बाद झाल्यानंतर भारताचा डाव 49.3 षटकात सर्वबाद 221 धावांवर संपूष्टात आला होता.
या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारताची आवस्था बिकट झाली होती. भारताने पहिल्या 6 विकेट्स 92 धावांवरच गमावल्या होत्या. परंतू धोनी आणि रविंद्र जडेजाने 116 धावांची 7 व्या विकेटसाठी भागिदारी रचत भारताला सावरले होते.
परंतू हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र भारताला पराभव स्विकारावा लागला. जडेजाने 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. तर धोनीने 72 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती.
या दिवशी होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
वाचा????https://t.co/ZBYgrQWWax????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020
टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा…
वाचा????https://t.co/JIdMyQOucd????#म #मराठी #Cricket @BCCIWomen @13harmanpreet #T20worldcup— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020






