दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जेपी डुमिनीने आपला आवडता फलंदाज निवडला आहे. तो दुसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आहे.
माजी झिम्बाब्वे क्रिकेटपटू आणि समालोचक पोमी म्बांग्वा (Pommie Mbangwa) बरोबर इंन्स्टाग्राम लाईव्हवर बोलताना ड्युमिनीने (JP Duminy) रोहितला त्याचा आवडता फलंदाज म्हणून निवडले. तो म्हणाला, की मला त्याचा पुल शॉट खूप आवडतो.
ड्युमिनी म्हणाला, “रोहित (Rohit Sharma) हा माझा आवडता फलंदाज आहे. मला त्याचा पिकअप पुल शॉट खरोखर खूप आवडतो.” रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे. ज्याने वनडेमध्ये तीन द्विशतक ठोकली आहेत. तसेच वनडेत २६४ धावांची सर्वोच्च खेळी खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. रोहित २०१९ विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ९ सामन्यांत ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या.
तसेच रोहित सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारही आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला ४ विजेतेपद जिंकून दिली आहेत. ड्युमिनी मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.
अलिकडेच ड्युमिनीने द सुपर ओव्हर पॉडकास्टमध्ये आपल्या ऑलटाईम आयपीएल इलेव्हनची निवड केली होती. त्याने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा विजेतेपद जिंकून देणाऱ्या एमएस धोनीला (MS Dhoni) संघात स्थान न देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) त्याने ऑलटाईम आयपीएल इलेव्हनचा कर्णधार म्हणून नेमलं होते. त्याने कोहलीला कर्णधार म्हणून निवडणे सर्वांसाठी आश्चर्यकारक ठरले. कारण विराटला एकदाही बेंगलोरला विजेतेपद मिळवून देता आलेले नाही.
ड्युमिनीचा ऑलटाईम आयपीएल इलेव्हन संघ-
ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, ब्रेट ली, मुथय्या मुरलीधरन, लसिथ मलिंगा, इम्रान ताहिर
ट्रेंडिंग घडामोडी-
-“…तर मी भारतीय संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकलो असतो”
-तो दादाच आहे… अगदी ट्विटरवरही इंग्लडच्या नासीर हुसेनला ठरला भारी
-‘या’ क्रिकेटपटूचा झाला कार अपघात; डोक्याला लागला मार