---Advertisement---

माजी दिग्गज म्हणतो, पुजाराला माझ्या वनडे संघात खेळू दिल्या असत्या ५० ओव्हर

On: शनिवार, जुलै 18, 2020 5:56 PM
---Advertisement---

मुंबई । 32 वर्षीय चेतेश्वर पुजारा हा राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून ओळखला जातो. भारतीय कसोटी संघाचा हा मुख्य आधार आहे. पुजारासह विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या कसोटी संघात चांगलेच स्थान पक्के केले आहे.

पुजाराचा संयम, लवचिकता आणि सातत्य यामुळे तो तिसर्‍या स्थानासाठी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. खेळाच्या पारंपारिक स्वरुपात त्याची योग्यता सिद्ध करूनही त्यांचा वनडे क्रिकेटचा प्रवास छोटा राहिला आहे. 2013 मध्ये पदार्पण केल्यापासून सौराष्ट्रच्या अनुभवी खेळाडूने केवळ पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत.

भारताचे माजी डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशी म्हण‍ाले की, “पुजारासारख्या फलंदाजास माझ्या वनडे संघातून वगळणार नाही. वनडे क्रिकेटमधला डाव संपेपर्यंत पुजाराला फलंदाजी करण्यास  सांगितले असते. दुर्दैवाची बाब म्हणजे कधीकधी पुजारासारख्या उच्च स्तरीय फलंदाजाला तो ‘खूप स्लो’ खेळतात असे लोक म्हणतात.”

ते म्हणाले, ‘मी माझ्या एकदिवसीय संघात पुजारासारख्या खेळाडूस नक्कीच घेईल. मी त्याला 50 व्या षटकपर्यंत फलंदाजी करण्यास सांगेन आणि मला वाटते की तो तसं करण्यासाठी सक्षम आहे. दोशी म्हणाले, “जेव्हा लोक चेतेश्वर पुजारासाऱ्या फलंदाजांना धिम्या गतीने खेळणारा खेळाडू म्हणतात, तेव्हा मला त्रास होतो.”

टी -20 क्रिकेटबद्दल दोशी म्हणाले की, ‘कसोटी क्रिकेट हा ‘ब्रॉड कॅनव्हास’ आहे.”  33 कसोटी आणि 15 वनडे सामने खेळणार्‍या दोशीच्या म्हणण्यानुसार, आधुनिक काळातील फलंदाजांमध्ये संयम नसणे हे दर्जेदार फिरकीपटूविरूद्ध संघर्ष करण्याचे कारण आहे.

‘मी यंगस्टर्सला चेंडू हवेत मारण्यास प्रोत्साहित करेन आणि मोठी फटका बसण्याची भीती बाळगू नका. फलंदाजांसाठी धाव ही ऑक्सिजन पुरवण्यासारखी असते, म्हणून त्यांना सहज धावा देऊ नका, प्रयत्न करा आणि त्यांचा दम घ्या,’ असा सल्ला युवा स्पिनर्सला दोशी यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---