---Advertisement---

‘या उन्हाळी हंगामात केन विलियम्सन विराट कोहलीपेक्षा जास्त धावा करेल,’ पाहा कोणी केलंय हे विधान

---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या विराट कोहली आणि केन विलियम्सन यांना सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. आता हे दोघे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर फलंदाज म्हणूनच नाही, तर कर्णधार म्हणूनही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दरम्यान, नुकतेच या दोघांबाबत इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी मोठे विधान केले आहे.

वॉन नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी एक विधान केले होते की विराट कोहली भारतीय असल्यामुळे महान मानला जातो व जर केन विलियम्सन त्याच्या जागी भारतीय खेळाडू असता तर त्याला महान म्हटले गेले असते. तसेच या वेळी देखील वॉर्न यांनी आणखी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्न यांच्या मते येणाऱ्या उन्हाळ्याच्या क्रिकेट हंगामात विलियम्सन हा विराटपेक्षा अधिक धावा करेल.

भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जूनपासून खेळला जाणार आहे. वॉर्न यांच्या मते दोन्ही दिग्गज फलंदाज जबरदस्त तयारीसह या सामन्यात येतील आणि एकमेकांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतील.

स्पार्क स्पोर्ट्सवरील कार्यक्रमादरम्यान वॉन यांनी दोन्ही खेळाडूंबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘माझ्या मते अनेक लोक विराटबद्दल बातचीत करत आहेत, मग ते त्यांना आवडू अथवा नाही. विराटने गेल्या वेळी इंग्लंडच्या परिस्थितीत चांगली फलंदाजी केली होती, परंतु इतर वेळी त्याने संघर्ष केला आहे. माझ्या मते या उन्हाळी हंगामात केन विलियम्सन विराट कोहलीपेक्षा जास्त धावा करेल.’

या पुढे वॉन यांनी विल्यमसनचे कौतुक केले आणि त्याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातील आकडेवारी स्पष्ट केली. वॉर्न असेही म्हणाले की विलियम्सनकडे सोशल मीडियात विराट प्रमाणे फॉलोवर्स नाहीत. तसेच काही ब्रँड नाहीत. वॉन म्हणाले की, विलियम्सनचे 100 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्स नाहीत आणि विराट कोहलीप्रमाणे व्यावसायिक करारामधून 30-40 मिलियनची कमाई देखील केली नाही. नाहीतर विराटपेक्षा विलियम्सन सरस आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी त्याला कधीच विसरू शकत नाही, कारण…”, टीम पेनचे कोहलीबाबत मोठे भाष्य

जिंदगी हो तो ऐसी! इमाम उल हकने भन्नाट मिम शेअर करत अविवाहित खेळाडूंची केली चेष्टा

खेळाडूंनी दिला होता लसीकरणाला नकार, आयपीएलबद्दल धक्कादायक बातमी समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---