---Advertisement---

‘सगळ्यांकडून शिकायचं आहे, पण अनुकरण नाही’, लखनऊचा कर्णधार कृणालची प्रतिक्रिया चर्चेत

On: गुरूवार, मे 18, 2023 8:24 PM
krunal Pandya
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा 2023 हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफच्या चार जागांसाठी संघ प्रयत्न करत आहे. कृणाल पंड्या याच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये जागा मिळवेल, अशी दाट शक्यता आहे. लखनऊचा नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे हंगामातून बाहेर झाला. पण राहुनंतर कृणालने चांगल्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. नेतृत्वाबाबत बोलताना कृणालने नुकतीच एक खास प्रतिक्रिया दिली.

कृणाल पंड्या (Krunal Pandya) भारतीय संघाचा एकेकाळी महत्वाचा खेळाडू होता. पण सध्या तो भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये यावर्षी त्याला कर्णधारपदाची संधी मिळाली, जी त्याने अगदी योग्य पद्धतीने साधली. कर्णधारपदाबाबत त्याला सर्वांकडून शिकायचे असते, मात्र कुणाचेच अनुकरण करण्याची इच्छा नाही, असे कृणालचे मत आहे. माध्यमांशी त्याने नुकतीच चर्चा केली. यावेळी तो म्हणाला, “केएल राहुल संघातून बाहेर झाल्यानंतर निराशा झाली. पण मीदेखील आव्हान (कर्णधारपदाचे) स्वीकारले आणि त्यावर खरे उतरण्याचा प्रयत्न केला. मी संघाचा उपकर्णधार होतो हे जाहीर आहे आणि त्यामुळेच माझ्यात काहीच बदल झाला नाही. मी नेहमी ज्या पद्धतीने खेळत आलो, तसाच खेळत आहे. संघाचे कर्णधारपद देखील मी त्याच पद्धतीने पार पाडत आहे.”

“मी कोणाचे अनुकरण करू इच्छित नाही. पण होय प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे, ज्यासाठी मी प्रयत्न करतो. मी या गोष्टी माझ्या पद्धतीने करू इच्छितो. मी माझ्या पद्धतीने काम केले, तर संघ चांगले प्रदर्शन करेल, याची शक्यता जास्त असते. मी खूप मेहनत घेत आणि एका ठरलेल्या पद्धतीने क्रिकटे खेळले आहे. हीच पद्धत मी नेतृत्व करतानाही अमलात आणतो,” असे कृणाल पुढे म्हणाला. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सला चालू आयपीएल हंगामातील आपला पुढचा सामना शनिवारी (20 मे) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचा आहे. जर या सामन्यात लखनऊ संघ जिंकला, तर त्यांचे प्लेऑफचे तिकिट पक्के होईल. (I want to learn from everyone, but I don’t want to imitate them, said Krunal Pandya)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
’18 नंबरची जर्सी माझी चॉईस नव्हती’, विराटने सांगितलं काय आहे अनोखं कनेक्शन
लैंगिक शोषणाचे आरोप, टी-20 विश्वचषकादरम्यान अटक; श्रीलंकन क्रिकेटपटूबाबत कोर्टाने दिला निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---