जगभरातील प्रतिष्ठित आणि सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग अव्वलस्थानी येते. या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून खेळाडू येतात. काहींना संधी मिळते, तर काहींना मिळत नाही. मात्र, काही खेळाडू स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडून खेळले असतात, तरीही त्यांना इतर संघांकडून खेळण्याची इच्छा होते. अशीच काहीशी इच्छा भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याचीही होती. याबाबत त्याने खुलासा केला आहे.
हरभजन सिंगचा खुलासा
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने खुलासा करत सांगितले की, त्याला आयपीएलमध्ये शेवटच्या काही वर्षांमध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून खेळायचे होते. हरभजननुसार, त्याला शेवटचे 2-3 वर्षे पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते. याविषयी त्याने दु:ख व्यक्त केले की, त्याला कधीच पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
‘मला पंजाबकडून खेळून आपले कौशल्य दाखवायचे होते’
हरभजन सिंग याने सांगितले की, त्याला त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या वर्षांमध्ये पंजाबकडून खेळायचे होते. तो म्हणाला की,”मला पंजाब किंग्सकडून खेळण्याची संधी कधी मिळालीच नाही. मला माझ्या कारकीर्दीच्या शेवटच्या 2-3 वर्षांमध्ये पंजाब किंग्सकडून खेळायचे होते. तसेच, माझ्यात जे कौशल्य आहे, त्यांचा संघाच्या हितासाठी वापर करायचा होता.”
हरभजन आयपीएलमध्ये कोणकोणत्या संघांकडून खेळलाय?
हरभजन सिंग याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच आयपीएलमध्येही एक यशस्वी गोलंदाज राहिला आहे. तो आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी सर्वप्रथम जोडला गेला होता. त्याने मुंबईचे नेतृत्वही केले होते. मुंबईकडून तो अनेक वर्षे खेळला. त्यानंतर त्याने 4 वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दोन वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचेही प्रतिनिधित्व केले. मात्र, त्याला पंजाब किंग्सकडून खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही.
हरभजनची आयपीएल कारकीर्द
हरभजनच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 163 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 150 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्याचे नाव आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अव्वल 10 गोलंदाजांच्या यादीत सामील आहे. मात्र, हरभजनला या गोष्टीची खंत वाटते की, तो त्याचा राज्य संघ पंजाब किंग्ससाठी खेळला नाही. हरभजनने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत अनेक यादगार कामगिरी केली. त्याचा आयपीएलमधील इकॉनॉमी रेटदेखील (7.8) शानदार होता. (i wanted to play for punjab kings in my career reveals this legend player )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांसाठी मोठी बातमी! इंग्लंडमध्ये यशस्वीरीत्या पार पडली श्रेयस अय्यरची सर्जरी, पण ‘ही’ समस्या कायम
लॉकडाऊनने कसं फळफळलं सिराजचं नशीब? पठ्ठ्याने स्वत:च केला रहस्याचा उलगडा