सध्या फारच कमी क्रिकेटर तीन्ही प्रकारचे क्रिकेटचे सामने खेळत असून ते त्यामध्ये उत्तम कामगिरीही करत आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा मर्यादित षटकाचा कर्णधार इऑन मॉर्गनने कसोटी क्रिकेटबद्दल आपले आश्चर्यकारक मत मांडले आहे.
मॉर्गनने 2010 ते 2012 दरम्यान 16 कसोटी क्रिकेटचे सामने खेळले असून तो कसोटी क्रिकेट उत्तम खेळू शकत नाही हे त्याने मान्य केले आहे.
मला कसोटी क्रिकेटमध्ये अॅंड्र्यू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली. तसेच मी चांगल्या संघासोबत खेळलो होतो. कसोटीमध्ये अनेक खेळाडू येतात. काहींना तेथे टिकून राहता येते. येथे काही गोष्टी या मनाप्रमाणे नाही होते. मी या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास पुरेसा योग्य नाही, असे मॉर्गन म्हणाला.
त्याने 2010मध्ये बांगलादेश विरुद्ध अॅंड्र्यू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली कसोटीमध्ये पदार्पण केले. कारकिर्दीत त्याने 16 कसोटी सामन्यात 30.43च्या सरासरीने 700 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
नुकतेच इंग्लंडने जो रुटच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेवर कसोटीमध्ये 3-0 असा विजय मिळवला असून 1965 नंतर पहिल्यांदाच त्यांनी परदेशात संघाला व्हाईटवॉश दिला आहे.
इंग्लंडमध्ये पुढील वर्षात आयसीसीचा विश्वचषक खेळला जाणार आहे.” या स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत. त्यामध्ये एकही चूक करणे महागात पडू शकते”, असे मॉर्गन म्हणाला.
माॅर्गनने 212 वन-डे सामन्यात 11 शतकांच्या मदतीने 6557 धावा केल्या आहेत. तर 77 टी20 सामन्यांमध्ये 1734 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेट क्रिकेटसारखच खेळा, जोशात प्रामाणिकपणा सोडू नका
–आज सचिनबरोबर १२ खेळाडूंनी केले होते एकाच सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण
–टी२० जागा न मिळालेल्या धोनीची या स्पर्धेत चमकदार कामगिरी