भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसात नेतृत्त्वाबद्दल बरीच चर्चा रंगली. विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्व सोडल्यानंतर त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आणि ही जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर टाकण्यात आली. विराटकडे आता केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. भारतीय संघाच्या या नेतृत्त्व (India Captain) बदलाबाबत अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या. आता याबद्दल भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने आपले मौन सोडले आहे.
रविवारपासून (२६ डिसेंबर) भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियन येथे कसोटी सामना खेळायचा आहे. त्यापूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला भारतीय संघाच्या नेतृत्त्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मात्र, द्रविडने तो अंतर्गत संभाषणाबद्दल वाच्यता करणार नसल्याचे स्पष्ट केले.
द्रविड म्हणाला, ‘खरं सांगायचं तर, ती (नेतृत्त्व बदल) निवडकर्त्यांची भूमीका होती. तसेही माझी काय चर्चा झाली किंवा नाही, याबद्दल मी काही बोलणार नाही. त्यासाठी ही योग्य वेळ आणि ठिकाण नाही. तसेच मी माझी काय चर्चा झाली, ती मीडियासमोर येणार नाही. मी अंतर्गत संभाषण काय झाले, हे कोणालाही सांगणार नाही.’
असे असले तरी, द्रविडने विराटचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, ‘विराट एक चांगला खेळाडू आणि कर्णधार असून त्याने मोठी भूमिका निभावली आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याला कसोटी क्रिकेट आवडते. आशा आहे की त्याच्यासाठी अगामी मालिका फलदायी ठरेल. त्याचा भारताला फायदा होईल.’
अधिक वाचा – द्रविडच्या ‘या’ सल्ल्यामुळे मयंक करू शकला संघात पुनरागमन, स्वतः केला खुलासा
नक्की का होतेय नेतृत्त्वाबद्दल इतकी चर्चा?
विराटने टी२० विश्वचषक २०२१ नंतर टी२० संघाचे कर्णधारपद स्वत:हून सोडले होते. त्यानंतर काही दिवसातच त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आले. याबद्दल भाष्य करताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितले होते, की त्याने विराटला विनंती केली होती की त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडू नये, मात्र विराट आपल्या निर्णयावर ठाम होता. त्यामुळे निवड समीतीला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार योग्य वाटत नसल्याने विराटला वनडे कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले.
मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत विराटने (Virat Kohli) स्पष्ट केले की, त्याने टी२० कर्णधारपद सोडताना तो वनडे आणि कसोटीचे नेतृत्त्व करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्याला कोणीही टी२० कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली नव्हती. त्याचबरोबर वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय त्याच्याशी कोणतीही चर्चा न करता घेण्यात आला होता.
त्यामुळे गांगुली आणि विराट या दोघांच्याही विधानांमध्ये विरोधाभास होता, हे स्पष्ट झाले. त्यामुळे अनेक उलट-सुलट चर्चांनाही सुरुवात झाली.
व्हिडिओ पाहा – ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ डिसेंबरपासून ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दुख:द! माजी इंग्लिश कर्णधाराचे निधन, प्रथम श्रेणीत नावे होत्या २४ हजार धावा अन् २००० विकेट्स
पहिले कसोटी शतक, पहिला विजय अन् बरचं काही; द. आफ्रिकेशी जोडलेल्या आहेत द्रविडच्या खूप आठवणी